येत्या दोन दिवसात पंढरीतील दुकाने उघडणार :  उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील सद्य परिस्थितीची उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्यामुळे पंढरपुरात प्रचारासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून यावर चर्चा केली व नवीन सुधारित आदेशाप्रमाणे येत्या दोन दिवसात दुकाने उघडण्याचा प्रस्ताव मंजूर होईल, असे या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यावमुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

    पंढरपूर  : पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभेच्या ठिकाणी जाण्यापूर्वी पंढरीतील नाराज व्यापारी वर्गाची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व व थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर येत्या दोन दिवसात दुकाने उघडतील, असे ठाम आश्वासन दिले आहे.

    पंढरपुरातील व्यापारी वर्गाने अचानक लागलेल्या कडक अंमलबजावणीला विरोध करत, गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण व्यापारी दुकाने उघडतीलच, अशी भूमिका घेतली होती. यावर भाजपचे वरिष्ठ नेते व आ. प्रशांत परिचारक यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातल्यानंतर ही बाब आपण मुख्यमंत्र्यांना कळवू, असे व्यापाऱ्यांना स्पष्ट केले होते.

    या प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील सद्य परिस्थितीची उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्यामुळे पंढरपुरात प्रचारासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटले. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून यावर चर्चा केली व नवीन सुधारित आदेशाप्रमाणे येत्या दोन दिवसात दुकाने उघडण्याचा प्रस्ताव मंजूर होईल, असे या शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यावमुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.