पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचे समाधान अवताडे ३७०० मतांनी विजयी

पंढरपुरात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. नियमांप्रमाणे आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट सामना पाहायला मिळत आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांनी सहाव्या फेरीनंतर शेवटपर्यंत आघाडी घेतली. ३८ फेरीअखेर भाजपाचे समाधान आवताडे यांनी ३७०० मतांनी आघाडी घेत भालके यांचा पराभव केला आहे .

    देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची. या निवडणुकीचे अंतिम निकाल आले असून भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी ३७०० मतांनी विजय मिळविला आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली. त्यामुळे भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरच्या जनतेने साथ दिली नाही उलट महाविकास आघाडीचा डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ गेली आहे.

    पंढरपुरात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. नियमांप्रमाणे आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट सामना पाहायला मिळत आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांनी सहाव्या फेरीनंतर शेवटपर्यंत आघाडी घेतली. ३८ फेरीअखेर भाजपाचे समाधान आवताडे यांनी ३७०० मतांनी आघाडी घेत भालके यांचा पराभव केला आहे .

    मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मतं मिळाली आहेत तर आवताडेंना ७ हजार ९७८ मतं मिळाली आहेत.

    समाधान आवताडे यांना ३५ व्या फेरीअखेर ४५४९ मतांची आघाडी होती. त्यानंतर, आवताडे यांच्या घराबाहेर भाजपा समर्थकांकडून विजयी जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या पोटनिवडणुकीच्या निकालातील महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजपाच्या समाधान आवताडेंमध्येच चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात एकूण १९उमेदवार रिंगणात होते, पण इतर उमेदवारांना हजार मतंही घेणं अवघड बनलं होतं. समाधान आवताडे यांनी १९ व्या फेरीपर्यंत म्हणजे पढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील मतमोजणी होईपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यानंतर, मंगळवेढा येथील मतमोजणीला सुरुवात होताच, त्यांच्या आघाडीच्या मतांमध्येही चांगली वाढ झाल्याचे सातत्याने दिसून आलं. ३८ व्या फेरीनंतर अधिकृत विजयाची घोषणा झाली असून सध्या भाजपा नेते आणि समर्थकांनी विजयी जल्लोष सुरू केला आहे.