ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटMay, 02 2021

LIVE: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे विजयी, राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा पराभव

द्वारा- Vanita Kamble
कंटेन्ट रायटर
17:23 PMMay 02, 2021

भाजपाचे समाधान अवताडे विजयी

३७०० मतांनी आवताडे विजयी

14:04 PMMay 02, 2021

भाजपाचे समाधान अवताडे आघाडीवर

समाधान आवताडे यांना  ३१  व्या फेरीअखेर  ६११२  मतांची आघाडी

12:45 PMMay 02, 2021

भाजपाचे समाधान अवताडे आघाडीवर

२३ व्या फेरीअखेर ५८०७ मतांनी आवताडे आघाडीवर

11:42 AMMay 02, 2021

समाधान दादा अवताडे यांना४१०० मतांचे लीड

पंढरपूर शहर आणि २२ गावांमधून समाधान दादा अवताडे यांना४१०० मतांचे लीड मिळाले आहे

11:12 AMMay 02, 2021

१८व्या फेरीअखेरचे निकाल

 

 

समाधान आवताडे सुमारे ४१०० मतांची आघाडी

11:09 AMMay 02, 2021

१५व्या फेरीअखेरचे निकाल

समाधान आवताडे सुमारे ३८०० मतांची आघाडी ; पंढरपूर शहरानंतर कासेगाव आणि खर्डी या गावातून मताधिक्य

10:36 AMMay 02, 2021

पंढरपूर निवडणूक : भाजप आघाडीवर

१० वी फेरी अखेर आवताडे ३००० मतांनी आघाडीवर

10:36 AMMay 02, 2021

पंढरपूर निवडणूक : भाजप आघाडीवर

१० वी फेरी अखेर आवताडे ३००० मतांनी आघाडीवर

10:24 AMMay 02, 2021

पंढरपूर निवडणूक निकाल

९व्या फेरीच्या अखेर आवताडे २३५७ मतांनी आघाडीवर

 

10:24 AMMay 02, 2021

पंढरपूर निवडणूक निकाल

९व्या फेरीच्या अखेर आवताडे २३५७ मतांनी आघाडीवर

 

Load More

पंढरपूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काही तासांतच जाहीर होणार आहे. या निवडणुकी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. यामुळे येथे पोटनिवडणुक घेण्यात आली. या एका जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात उतरले.

सकाळी ८ वाजल्यापासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत या निवडणुकीचे चित्रं स्पष्ट होईल. तसेच दुपारी ३ च्या आत या निवडणुकीचा अधिकृत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करूनच मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास उशिर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपसाठी ही निवडणुक प्रतिषठेची लढाई बनली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी जाहीर प्रचार सभा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर, भाजपच्या दिग्गज नेत्यांची फौज देखील प्रचारासठी मैदानात उतरली होती. पंढरपुरात प्रचंड मतदान झाल्याने या निवडणुकीत कोण विजयी होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. भालके यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर, भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३४९८८९ मतदारांपैकी २२५४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या पोटनिवडणुकीत सरासररी ६६.१५ टक्के मतदान झालं.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
१७ सोमवार
सोमवार, मे १७, २०२१

आधी मूक मोर्चे, त्यानंतर ठोक मोर्चे आणि आता पुन्हा मोर्चे अशी सातत्याने भूमिका बदलल्याने मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळेल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.