election

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर असून २०१९ साली  झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी निर्णायक मते घेतली होती तर भाजपाकडून स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा निसटता पराभव झाला होता.

    पंढरपूर :राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार स्वर्गीय भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून २३ मार्च २०२१ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. ३० एप्रिल अर्ज भरण्याची शेवटची तारीख तर ३ एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. यासाठीचे मतदान १७ एप्रिल २०२१ रोजी होणार असून २ मे २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.

    पोटनिवडणूक जाहीर झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी सहा महिन्यात पोटनिवडणूक घेण्यात येणार होती. त्यानुसार पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

    दरम्यान, विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्वर्गीय आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर असून २०१९ साली  झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी निर्णायक मते घेतली होती तर भाजपाकडून स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा निसटता पराभव झाला होता. एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत यंदा परिचारक कुटुंबियातील प्रणव परिचारक यांचे नाव पुढे केले जात असली तरी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी भाजपाकडून कोण उमेदवार असणार ? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.