पांडुरंग कारखाना सेंद्रिय ऊस पिकाला प्रोत्साहन देणार

  अकलुज : सेंद्रिय अन्नाचे सेवन करण्याकडे अधिक कल वाढत आहे. आरोग्याबाबत लोक जागृत झाले आहे. सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादनाचा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व ओळखून पांडुरंग कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी युवा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी सेंद्रिय तज्ञ अनिल कुलकर्णी यांचे सेंद्रिय ऊस पीक परिसंवादाचे आयोजन केले होते.

  त्यावेळी कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक, दिनकर मोरे, रोहन परिचारक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आदी संचालक व युवा शेतकरी उपस्थित होते. सेंद्रिय तज्ञ अनिल कुलकर्णी यांनी सांगितले की अलिकडे रासायनिक खतांचा बेसुमार वापर करत असल्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. बेसुमार रासायनिक खताच्या वापरामुळे आज जरी ऊस पिकाचे उत्पन्न जास्त निघत असले तरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये दिवसेंदिवस जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. आपल्याला आद्य कर्तव्य आहे की, जमिनीची सुपीकता टिकवणे रासायनिक खतांवरील खर्च करून करणे यासाठी सेंद्रिय ऊस पीक घेणे ही काळाची गरज आहे.

  शेतकऱ्यांना सांगण्यात आले की सेंद्रिय शेती करण्यापूर्वी तयारीला अत्यंत महत्त्व आहे आणि प्रत्येक शेतीचे काम वेळेवर झाले पाहिजे. मग ते सेंद्रिय खताचे उत्पादन, औषध, पाणी व्यवस्थापन किंवा पिकामध्ये विविध प्रकारच्या लिक्विडचा योग्य वापर असो. त्याचवेळी, एकापेक्षा जास्त पिके नेहमी लावली पाहिजेत जी एकमेकांना पूरक असतात. शेतकऱ्यांना सांगितले की सेंद्रिय शेतीचा मुख्य आधार त्यांच्याकडे उपलब्ध शेणखत किंवा कंपोस्टिंग सामग्री आहे. शेतीच्या वाढत्या खचार्र्मुळे त्रस्त झालेले शेतकरी उच्च व्याजदर असलेल्या कर्जाच्या सापळ्यात अडकत गेले. त्यांची आर्थिक स्थिती, कल्पनेबाहेर बिकट होत गेली आणि बर्‍याच त्रस्त शेतकर्‍यांनी नैराश्येतून आत्महत्या केली.हे सर्व थबविण्यासतठी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे.

  सेंद्रिय ऊस पिकासाठी जिवाणू खताचा वापर करा

  अधिक ऊस उत्पादन मिळविण्याच्या हव्यासापोटी अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे भविष्यात जमिनीची सुपीकता कमी होणार आहे. त्यासाठी सुपिकता टिकवण्यासाठी पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून जैविक उत्पादने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या करता उत्पादित करून पुरवठा करीत आहोत त्याचा लाभ घेऊन ऊस उत्पादनामध्ये वाढ करावी, असे आव्हान कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी केले.

  सेंद्रिय शेतीचे फायदे 

  जमिनीतील भौतिक व जैविक गुणधर्म सुधारून सुपीकता व उत्पादन वाढते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ होते, पाणीधारण क्षमता वाढते, अन्नद्रव्य वाढते, ऊस पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढून ऊस जोमात वाढतो. सेंद्रिय शेतीमुळे दर्जेदार उत्पादन मिळते. पर्यावरण समतोल राखता येतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शाश्‍वत उत्पादन मिळते.