सोलापूर जिल्ह्यात ‘पांडुरंगची’ सर्वाधिक एफआरपी

  अकलुज : गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये पांडुरंग कारखान्यांची एफआरपी २४३१ रुपये प्रति मे.टन असून कारखाने पहिला हप्ता २१०० रुपये प्रती मेट्रिक टनप्रमाणे एकरकमी ऊस बिल दिले आहे. कारखाना बंद झाल्याबरोबर रु. १३१ प्रती मे.टन ऊस बिल अदा केले आहे. आणि आता पोळ्या सणाला शेतकऱ्यांनी १०० रुपये प्रमाणे ऊस बिल देत आहोत. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना प्रति मे.टन २३३१ प्रमाणे ऊस दर मिळाला असून उर्वरित रक्कम ही लवकर देणार आहे. केंद्र शासनाने एफआरपी धोरणानुसार शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ९६ टक्के एफआरपी रक्कम अदा केले आहे, असे कारखान्याचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. त्यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डों. यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.

  पांडुरंग कारखान्यांनी गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसाचे प्रति मेट्रिक टन शंभर रुपये प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले असून शेतकऱ्यांचे बँक खात्यात ऊस बिलाची एकूण रक्कम १० कोटी जमा केली आहे. कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांना पोळ्यास व दिवाळीसारख्या सणांसाठी योग्यवेळी पैसे उपलब्ध करून दिले आहेत.

  गाळप हंगाम २०२०-२१ अत्यंत उत्कृष्टपणे चालला असून, हा हंगाम कारखान्यास उसाची कमतरता जाणवली नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवून या हंगामात कारखान्याचे ऊस देऊन सहकार्य केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी covid-19 च्या परिस्थितीत आर्थिक अडचणीत असताना पांडुरंग कारखाने मात्र गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये गाळप केलेल्या उसाला पोळा सणाला प्रतिटन शंभर रुपयेप्रमाणे बिल दिल्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना महत्त्वाचा असणारच पोळा सण हा मोठ्या आनंदाने साजरा करण्यासाठी पैशाची गरज असताना कारखान्याने ऊस बिल रक्कम बँकेच्या खात्यात वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डों. यशवंत कुलकर्णी सगितली.

  पोळा सणासाठी जाहीर केला होता हप्ता

  कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै. सुधाकरपंत परिचारक यांनी मागील वर्षी कोरोनामुळे पुणे येथील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेत असताना शेतकऱ्यांना पोळा सणासाठी ऊस बिल हप्ता देण्यास सूचना कार्यकारी संचालक यांना दिल्या होत्या. त्यावेळी सूचनेप्रमाणे पोळ्या सणासाठी कोरोनाच्या परिस्थितीत आर्थिक अडचणी असताना सुद्धा उसाच्या दराचा हप्ता देण्यात आला होता. त्याचप्रमाणे ही परंपरा कायम ठेवत ‘शेतकरी हिताय, कामगार सुखाय’ या उक्तीप्रमाणे परिचारकांचा आदर्शचा वारसा कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक, अधिकारी कर्मचारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने पुढे तसाच सुरू ठेवला आहे.

  गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये कारखान्याची जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा साखर उतारा मिळाला असून जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर ऊसदर ही दिला आहे. त्याच बरोबर येणार्‍या हंगामात असावनी प्रकल्प व इथेनॉल निर्मिती प्रकल्प क्षमतेने ९० केएलइडीने वाढ होणार असून, कारखान्याचे गाळप प्रति ७००० हजार मेट्रिक टनावर होणार आहे. गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये मध्ये कारखान्याने १०.०६ लाख मेट्रिक टन गाळप करून ११.४१% सरासरी साखर उतारा घेऊन ११.१३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊन कारखान्याने उद्दिष्टपूर्ती केली आहे. येणार्‍या हंगामात ११ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे.

  डॉ. यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पांडुरंग कारखाना, श्रीपूर