पाणी फाउंडेशन : सोलापूर जिल्ह्यातील ३७ गावे ठरली सन्मानपात्र

समृध्द गाव या स्पर्धेचा कालावधी दोन वर्षाचा असून सन २०२०-२२ या दोन वर्षात ५०० गुणांचे काम करावयाचे आहे. या स्पर्धेत चार तालुक्यातील ५६ गावानी सहभाग घेतलाहोता. पहिल्या टप्प्यात 37 गावे सन्मानपात्र ठरली असली तरी उर्वरीत गावे देखील या वर्षात काम अधिक काम करुन गुण मिळवु शकणार आहेत.या स्पर्धेत मध्ये उत्कृष्ट काम करणारी गावे अंतीम विजेती ठरणार आहे.सोलापूर जिल्ह्यातील सहभागी गावे समृद्ध करण्यासाठी जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख, जिल्हा तांत्रिक प्रशिक्षक समिक्षा पिंपळकर,उत्तर सोलापूर तालुका समन्वयक अतिश शिरगिरे,बार्शीचे नितिन आतकरे, माढ्याचे सुशांत गायकवाड तर करमाळ्याचे तालुका समन्वयक प्रतिक गुरव या कामासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

    सोलापूर : शिक्षणाबरोबर संस्कार जसे महत्वाचे आहेत तसे पाणी फाउंडेशनचे अमीर खान व टीमने गाव पाणीदार करण्यासाठी पाणी अडवणे, साठवणे हे महत्व नागरीकांना पटवून काम केले तर आता मृदा व संधारण, जलव्यवस्थापन, माती संवर्धन आदी सहा बाबींवर काम करुन गावे समृद्ध करण्याचे ध्येय घेतले आहे.ही बाब निश्चित कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
    पाणी फाउंडेशन समृद्ध गाव स्पर्धा पहिल्या टप्प्यात पात्र झालेल्या गावाच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी कृषीमंत्री दादा भुसे,मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,पाणी फौऊडेशनचे प्रनेते अमीर खान,किरणराव, डाँ..सत्यजित भटकळ,डॉ. अविनाश पौळ,मुख्य सचीव सिताराम कुंटे आदि मान्यवर उपस्थित होते.

    महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय घेऊन पाणी फाउंडेशनने प्रारंभी ३ तालुक्यात सुरु केलेले काम पुढे ७५ तालुक्यात वाढवले.मात्र केवळ पाणी अडवणे,साठवणे,मुरवणे महत्वाचे असले तर या पाण्यावर गावे समृद्ध करण्याची गरज आहे. यासाठी यावर्षी समृद्ध गाव स्पर्धा सुरु केली यामध्ये उपलब्ध पाणी, जमीनीचा स्तर, जलव्यवस्थापन,या बाबी महत्त्वाचे असून यावर्षी ३९ तालुक्यातील ९०० गावात काम करीत असल्याचे सांगितले.

    समृद्ध गाव स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ३७ गावे पहिल्या ठप्प्यात सन्मानपात्र ठरली असून यामध्ये-उत्तर सोलापूर- भागाईवाडी,वांगी,अकोलेकाटी, गुळवंची, खेड,राळेरास, शिवणी,हिरज, माढा-अकुलगाव,उजनी( माढा) उपळाई खुर्द,जामगाव,धानोरे, परीतेवाडी,बुद्रुकवाडी,भेंड,मानेगाव, रोपळे लोंढेवाडी,वडाचीवाडी,सोलनकरवाडी,▪️बार्शी- अरणगाव, इर्ले,खडकोणी,चिंचोळी,चुंब,मांडेगाव,मुंगशी आर,मुंगशी वा. रास्तापुर ,सुर्डी, करमाळा-कोंडेज,खडकी,गोरेवाडी,धारगाव, तरटगाव,शेळगाव क.या गावाचा समावेश आहे.

    समृध्द गाव या स्पर्धेचा कालावधी दोन वर्षाचा असून सन २०२०-२२ या दोन वर्षात ५०० गुणांचे काम करावयाचे आहे. या स्पर्धेत चार तालुक्यातील ५६ गावानी सहभाग घेतलाहोता. पहिल्या टप्प्यात 37 गावे सन्मानपात्र ठरली असली तरी उर्वरीत गावे देखील या वर्षात काम अधिक काम करुन गुण मिळवु शकणार आहेत.या स्पर्धेत मध्ये उत्कृष्ट काम करणारी गावे अंतीम विजेती ठरणार आहे.सोलापूर जिल्ह्यातील सहभागी गावे समृद्ध करण्यासाठी जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख, जिल्हा तांत्रिक प्रशिक्षक समिक्षा पिंपळकर,उत्तर सोलापूर तालुका समन्वयक अतिश शिरगिरे,बार्शीचे नितिन आतकरे, माढ्याचे सुशांत गायकवाड तर करमाळ्याचे तालुका समन्वयक प्रतिक गुरव या कामासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

    पाणीदार गांवे आता समृद्ध होणार : कविता घोडके-पाटील
    पाणी फौऊडेशनने राज्यातील गावे पाणीदार करण्यासाठी गावातील नागरीकांना मार्गदर्शन करुन प्रेरणा दिली.या चळवळीत लाखो श्रमदात्यांचे हात पुढे आले.सहभागी अनेक गावानी अफाट काम केले. आता समृद्ध गाव स्पर्धेत सन्मानपात्र ठरलेल्या गावातील नागरीक निश्चित सहा बाबींवर ध्येय व जिद्दीने काम करुन पाण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या समृद्ध होतील असा विश्वास भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील यांनी व्यक्त केला.