प्लास्टीकबंदी, अनधिकृत बांधकाम व कोरोनाचे नियम कठोरपणे राबवाणार : धैर्यशील जाधव

अकलूज नगर परिषदेत विकास कामे करताना पुढील ५० वर्षांचा विचार करुन योजना राबवण्यात येतील. सुधारीत पाणी पुरवठा योजना, अंङर ग्राऊंङ गटारे, अग्निशमन यंञणा, नळाला मिटर बसवणे अशा योजनांवर तातङीने कामे सुरु करण्यात येतील अशी माहीती धैर्यशिल जाधव यांनी दिली.

    अकलूज :  कोणत्याही भागाचा विकास एकाच दिवसात होत नाही. त्यासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज असते. अकलूज शहरात नगर परिषदेमार्फत विकास करण्यासाठी मी कटीबध्द असुन प्लास्टीकचा वापर, अनधिकृत बांधकामे व कोरोनाचे नियम कठोरपणे राबवणार असल्याची माहीती नूतन प्रशासक व मुख्याधिकारी असा दुहेरी पदभार घेतलेले धैर्यशील जाधव यांनी पञकार परिषदेमध्ये दिली.

    जाधव म्हणाले, कोरोनाच्या रोगाविषयी नागरीकांमध्ये गांभिर्य नाही. त्यासाठी त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. शासन प्लास्टीकचा वापर टाळण्यासाठी लोकांमध्ये प्रचार करत आहे. पण बरेच लोक प्लास्टीकचा अनिर्बंध वापर करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या नागरीकांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत अशांवर कठोर कारवाई केली जाईल. अकलूज कार्यक्षेञामध्ये कोणतेही झाङ नगर परिषदेच्या पुर्व परवानगीशिवाय तोङता येणार नाही. नागरीकांनी ओल्या आणी वाळल्या कच-याचे वर्गीकरण करुन ठेवावे. जेणेकरुन नगर परिषदेस कच-यावर प्रक्रीया करणे सोपे जाईल.

    अकलूज नगर परिषदेत विकास कामे करताना पुढील ५० वर्षांचा विचार करुन योजना राबवण्यात येतील. सुधारीत पाणी पुरवठा योजना, अंङर ग्राऊंङ गटारे, अग्निशमन यंञणा, नळाला मिटर बसवणे अशा योजनांवर तातङीने कामे सुरु करण्यात येतील,  अशी माहीती धैर्यशिल जाधव यांनी दिली.