पंढरपूरमध्ये पोलीस नाईक आमिन मुलाणी यांचे कोरोनामुळे निधन

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आठवडाभर त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु कोरोनाशी त्यांचा संघर्ष अपयशी ठरला. आज रविवारी पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

पंढरपूर : पंढरपूर शहरचे पोलीस नाईक आमिन आप्पा मुलाणी यांचा कोरोनामुळे निधन झाले आहे. मागील आठवड्यात मुलाणी यांना कोरोनाची लक्षण आढळल्याने कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. आठवडाभर त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु कोरोनाशी त्यांचा संघर्ष अपयशी ठरला. आज रविवारी पहाटे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.  

पोलीस नाईक आमिण आप्पा मुलानी यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि २ मुले व १ मुलगी आहे. त्यांनी नुकतेच आपल्या मुलीचा विवाह जमवला होता. परंतु कोरोनामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. त्यांची मुलीचा विवाह पाहण्याची इच्छा अपुरीच राहिली आहे.  

पंढरपुर शहरात एकूण ४ पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे तर १ पोलीस कर्मचाऱ्यावर कोरोनावर उपचार सुरु आहेत. तर आमिन मुलाणी यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने पंढरपुर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.