पोलिसांच्या दडपशाहीने आंदोलन थांबणार नाही : कॉ.आडम

कॉ.आडम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक

  सोलापूर : पोलिसांच्या दडपशाहीने आंदोलन थांबणार नाहीत शेतकरी आणि गोरगरीब जनतेसाठी लाठया खाण्यास तयार असा निर्धार माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी भारतबंद आंदोलना प्रसंगी केला. यावेळी शेकडो कार्यकर्त्य।ना अटक करण्यात आली.

   

  संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने २६ मार्च ला दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले असून अजूनही शेतकऱ्यांच्या आंदोलनास जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून केंद्र सरकारच्या विरोधात तसेच सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खाजगीकरण करून देशाला भांडवलदारांच्या हाती सुपूर्द करण्याचा घाट घातला आहे.लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून सरकार पोलिस यंत्रणा हाताशी धरून भारत बंद आंदोलन मोडून काढत आहेत.पोलिसांच्या दडपशाहीने आंदोलन थांबणार नाही.या कृतीचा तीव्र निषेध करत असत याहून अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करून सरकारला अस्वस्थ करण्याचा निर्धार कॉ.आडम मास्तर यांनी केले.

  शुक्रवार दिनांक २६ मार्च रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या सार्वजनिक उद्योगधंद्याच्या खासगीकरणच्या विरोधात भारत बंद करत असताना मा.जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना बळजबरीने ताब्यात घेऊन सदर बझार पोलीस ठाणे दाखल केले.

  यावेळी सुरुवातीला पूनम गेट येथे कॉ.सिध्दपा कलशेट्टी, अशोक बल्ला विजय हरसुरे मल्लेशाम कारमपुरी यांना ताब्यात घेतले तदनंतर अनिल वासम हे आंदोलन स्थळी नसताना रस्त्याच्या पलीकडे जाऊन पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व अन्य अधिकारी घेराव घालून बळजबरीने ओढत आणून पोलिसांच्या गाडीत घातले तेव्हा गाडीतच पोलिसांच्या दडपशाही विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी केली.अनिल वासम यांनी खाजगीकरण हाणून पाडा व भारत बंद यशस्वी करा अशा आशयाचे डिझिटल जॅकेट घालून केंद्र सरकार चा निषेध व्यक्त करण्यात आला.

  तदनंतर पूनम गेट येथे कॉ.नरसय्या आडम मास्तर व अँड.एम.एच.शेख हे दाखल होताच सर्व कार्यकर्ते एकत्र जमले यानंतर लगेच पोलीस सर्वांना ताब्यात घेतले.यावेळी नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी,रा.गो.म्हेत्रस, चन्नप्पा सावळगी,रंगप्पा मरेड्डी,सुनंदा बल्ला,शेवंता देशमुख, शकुंतला पानिभाते, लिंगव्वा सोलापूरे, दाऊद शेख, जावेद सगरी, अकिल शेख, शंकर म्हेत्रे,बाबू कोकणे,श्रीनिवास गड्डम,किशोर मेहता, शहाबुद्दीन शेख बाळासाहेब मल्ल्याळ, आसिफ पठाण आदीसह शेकडो कार्यकर्ते अटक झाली.