… अधिका-याविरोधातील उपोषण स्थगित ; कारवाईचे सीईओंकडून आश्वासन

उपोषणकर्ते सदस्य धाईंजे यांची माहीती

    सोलापूर : जिल्हा परिषदेच्या महीलाबालकल्याण विभागातील कथित पोषण अहारातील अनियमिते विरोधात उपोषण करणारे सदस्य त्रिभूवन धाईंजे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांच्या कारवाईच्या आश्वासन नंतर उपोषण स्थगित केले आहे.

    महिला बालकल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्या विरोधात गरोदर माता – बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण अहारात अनियमिता तसेच प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे यांच्यावर कारवाई न करता पाठबळ दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे पडसाद सभागृहात उमटले होते. अध्यक्ष अनिरुध्द कांबळे , सीईओ दिलीप स्वामी यांनी कथित प्रकरणावर चौकशी समिती नेमली आहे. अॅडी.सीईओ डॉ.अर्जुन गुंढे हे कथित प्रकरणाचा तपास करीत आहेत. महीलाबाल कल्याण आरोपा वरून राष्ट्रवादी भाजपा आमने सामने आले आहेत. आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरुचं आहे.

    महीलाबाल कल्याण विभागावर कारवाई होत नसल्याने सदस्य ञिभूवन धाईंजे यांनी सोमवारी उपोषणास करण्यास मैदानात उतरले , प्रशासनअधिकारी अनिल जगताप यांनी उपोषण न करण्याची विनंती केली. याच दरम्यान उपोषणस्थळा वरुन सीईओ दिलीप स्वामी यांचे फोनद्वारे संभाषण झाले. याबाबत पञकारांशी बोलताना सदस्य धाईंजे म्हणाले की, सध्या कोरोना संसर्गाचा फैलाव होत आहे. सीईओ कोरोनाग्रस्त असून उपचार घेत आहे. १० दिवसांचा कालावधी त्यांनी मागितला आहे. कथित प्रकरणाचा आहवाल सादर झाल्यानंतर कारवाई करण्याचे सीईंओंनी आश्वासन दिल्याचे सदस्य ञिभूवन धाईंजे यांनी सांगितले.