सोलापूर जनता बँकेवर परिवार पॅनलची सत्ता

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल मध्यरात्री दोन वाजता लागला, परिवार पॅनलचे सर्व १७ उमेदवार चार हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले.

  सोलापूर : सोलापूर जनता सहकारी मल्टीस्टेट शेड्युल बँकेची निवडणूक मोठ्या चुरशीची झाली. या निवडणुकीत संघ पुरस्कृत परिवार पॅनल यांच्याविरोधात बँक बचाव परिवार पॅनल यांनी आव्हान दिले होते. प्रचारही तसा जोमात झाला होता. परिवार पॅनेलचे नेतृत्व माजी अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी केले तर बँक बचाव परिवार पॅनेलचे नेतृत्व दामोदर दरगड रामभाऊ तडवळकर प्राध्यापिका मोहिनी पत्की यांनी केले होते. बँक बचाव पॅनेलने सभासदांचा डिव्हीडंट यासह बँकेचा एनपीए वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रचाराचे मुद्दे सभासदां समोर मांडले. मात्र परिवार पॅनल ने विरोधकांचे मुद्दे खोडून प्रचार केला होता. रविवार १४ मार्च रोजी झालेल्या मतदानादिवशी ५३ हजार ५५६ मतदारांपैकी १४ हजार १५१ सभासदांनी मतदान केले. केवळ २६ टक्के मतदान झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र परिवार पॅनलने आपल्या विजयाचा दावा केला होता मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भुरे यांच्या नेतृत्वाखाली नूतन मराठी विद्यालय यामध्ये मतमोजणी झाली. सकाळी पावणे नऊ वाजता सुरू झालेली मतमोजणी रात्री दोनच्या सुमारास संपली ५९ मतदान केंद्र असल्याने १ ते १५ असे चार मतमोजणी च्या फेऱ्या घेतल्या. एका फेरीसाठी सुमारे चार ते पाच तास मतमोजणीला वेळ लागला, त्यामुळे निकाल यायला उशीर लागला मात्र पहिल्या फेरीपासून सुमारे एक हजाराचे मताधिक्य परिवार पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी घेतले होते ते मताधिक्य चारही फेऱ्यात कायम राहिले आणि या निवडणुकीत परिवार पॅनलने सर्वच्या सर्व १७ जागा सुमारे चार हजाराच्या फरकाने जिंकल्या आहेत निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी अतिशय उत्तमरित्या ही निवडणूक हाताळली सोलापूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात सर्वात मोठी संस्था म्हणून नावाजलेल्या सोलापूर जनता बँकेची निवडणुकीला सोलापूर शहरासह जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात आणि कर्नाटकात मतदान केंद्र असतानाही केवळ सहकार विभागातच कर्मचारी या निवडणुकीला वापरले इतर कोणत्याही सरकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांविना ही निवडणूक यशस्वीपणे पार पडली.

  परिवार पॅनल व बँक बचाव पॅनल यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे
  संघ पुरस्कृत परिवार पॅनल विजयी उमेदवार
  वरदराज बंग, ८१०९
  ऍड. प्रदीपसिंह राजपूत,८१७९
  प्राचार्य गजानन धरणे, ८०८०
  सी. ए. सुहास श्रीगोंदेकर, ८०१४
  पुरुषोत्तम उडता, ८००९
  जगदीश भुतडा, ८३९१
  सुनिल पेंडसे, ८११३
  सी.ए. गिरीश बोरगांवकर, ८११३
  आनंद कुलकर्णी, ८१४१
  राजेश पवार,८०५४
  मुकुंद कुलकर्णी (बार्शी), ८६०८
  विनोद कुचेरीया (लातूर),८५२४
  दत्तात्रय कुलकर्णी (उस्मानाबाद),८८०३
  ऍड. मिलिंद कुलकर्णी (माळशिरस),८७५८

  महिला प्रवर्गातून
  चंद्रिका चौहान ८२५४
  डॉ. किरण पाठक ८२११

  अनुसूचित जाती प्रवर्गातून
  रवींद्र साळे (पंढरपूर), ८२४१