प्रकाश आंबेडकरांचे पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलन शांततेत

राज्य आणि केंद्र सरकारने भक्तांचा अंत न पाहता मंदिर प्रवेशास परवानगी द्यावी असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच वंचित आघाडीचे आंदोलन हे शांततेत पार पडणार आहे. पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते पंढरपूरात या आंदोलनाला उपस्थित राहू शकले आहेत.

पंढरपूर : राज्यातील नागरिकांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन पुकारले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमधील विठ्ठल मंदिरे उघडले. आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  सोलापूरहून पंढरपूरला (Pandharpur temple) रवाना झाले. प्रकाश आंबेडक यांच्या गाड्यांच्या ताफ्यात मोजकेच कार्यकर्ते होते.

राज्य आणि केंद्र सरकारने भक्तांचा अंत न पाहता मंदिर प्रवेशास परवानगी द्यावी असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच वंचित आघाडीचे आंदोलन हे शांततेत पार पडणार आहे. पोलिसांच्या नाकाबंदीमुळे वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते पंढरपूरात या आंदोलनाला उपस्थित राहू शकले आहेत.
या आंदोलनात मोजक्याच लोकांना नामदेव पायरीपर्यंत सोडणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोजक्या लोकांना मंदिराकडे सोडण्यात येणार आहे. पोलिसांचा मंदिर परिसरात मोठा बंदोबस्त आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलन करण्याचा इशारा वंचितने दिला होता. त्यामुळे काही कार्यकर्ते सकाळपासून पंढरपूरात तळ ठोकून होते.

सरकाने कीतीही फौज फाटा उभा केला आणि मंदिरात जाण्यास मज्जाव केला तरी आम्ही आंदोलन हे पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराला जाऊन धडकणार आहे. अस मत प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमध्ये व्यक्त केले आहे.