डिसले गुरुजींच्या घरी जावून प्रवीण दरेकरांची आमदारकीची ऑफर! ?

सात कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार मिळालेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या घरी जावून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सहकुटुंब सत्कार केला.

 

सोलापूर : आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे की, शिक्षक मतदारसंघात शिक्षक नसलेला आमदार होतो, ज्यांच्यासाठी तो मतदारसंघ असतो तो नसतो. साहित्यिक, प्राध्यापक यासाठी मतदारसंघ असतात, मात्र दुर्दैवाने निवडणूक होतात, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने डिसले यांच्या आमदारपदासाठी शिफारस करणार असल्याचे विधान प्रवीण दरेकर यांनी केले आहे. सात कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर प्राईज पुरस्कार मिळालेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या घरी जावून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सहकुटुंब सत्कार केला.

डिसले यांना मिळालेला पुरस्कार हा भारतीयांसाठी मान उंचावणारा आहे. यावेळी दरेकर यांनी फोनवरून विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बोलणे करून दिले. यावेळी फडणवीस आणि पाटील यांनी डिसले यांना त्यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक अडचणींना सामोरे जात काम करीत आहेत, त्यांना डिसले हे प्रेरणादायी आहेत. डिसले यांना ७ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला, यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि काम करावे, असेसुद्धा प्रवीण दरेकरांनी अधोरेखित केले आहे. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टिचर प्राईझ जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२हजारहून शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डीसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे.