रिफाह फाउंडेशने सामाजिक बांधिलकी जपत प्रीतीला घेतले शैक्षणिक दत्तक

    सोलापूर : रिफाह फाउंडेशन गेल्या दहा वर्षापासून देशाची एकता व अखंडता जपण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनाथ प्रीती निम्बर्गी या बहिणीच्या हातून राखी बांधून तिला शैक्षणिक दत्तक रक्षाबंधनाच्या दिवशी घेण्यात आले.

    प्रीतीच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी रिफाह फाउंडेशन घेत असून, त्याचाच एक भाग म्हणून आज प्रीतिला वही, कंपास, शालेय साहित्य व ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईलही देण्यात आला. यापुढील खर्चही रिफाह फाउंडेशन करणार आहे. प्रीतीने रिफाह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद यांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधून मोठे भाऊ होण्याचा मान दिला.

    रियाज सय्यद यांनी तिला वचन देत आज पासून माझी लहान बहीणी सारखे तुझ्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, ‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा, अशा भावना ही त्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी समद शेख, नईम जमादार, मुदस्सर मनुरे, इस्माइल गुनता, सैफन कुरेशी आदीजन उपस्थित होते.