घराला घरपण देणारी महिला आज गावाला विकासात्मक व ध्येयाने काम करत लौकिक मिळवुन देत असल्याचा अभिमान : चंचल पाटील

घराला घरपण देणारी महिला आज सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असुन आता गावाला विकासात्मक गावपण देणारी महिला ठरली आहे. संधी मिळालेल्या महिला सरपंच चांगले काम करुन गावास लौकीक मिळवुन देत आहेत.

    सोलापूर : घराला घरपण  देणारी महिला आज सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असुन आता गावाला विकासात्मक गावपण देणारी महिला ठरली आहे. संधी मिळालेल्या महिला सरपंच चांगले काम करुन गावास लौकीक मिळवुन देत आहेत. नुतन सरपंचानी देखील जिद्दीने काम करा प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, अशा भावना जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी व्यक्त केली.

    सरपंच परिषदेचे वतीने जागतिक दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यातील एक याप्रमाणे ११ महिला सरपंचाचा आदर्श सरपंच म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.
    कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य सरचिटणीस अँड. विकास जाधव होते. यावेळी सरपंच परिषदेच्या वतीने चंचल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व आदर्श जिल्हा परिषद सदस्या म्हणून रेखा राऊत यांचा सत्कार महिला जिल्हाध्यक्षा कविता घोडके- पाटील यांच्या हस्ते करुन शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी धनंजय बागल, बाबासाहेब जाधव,पंडीत खारे,नाना लेंगरे,आदि पदाधिकारी उपस्थित होते

    यावेळी ग्रामविकास कार्यात काम करीत असलेल्या व नुतन सरपंचाना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श महिला सरपंच पुरस्काराने शिवनेरी पाटील (बेलाटी-उत्तर सोलापूर)  वनिता सुरवसे (गोगाव-अक्कलकोट ) डाँ.प्रियांका खरात ( वाळुज-मोहोळ) ज्योती कुलकर्णी (हत्तुर-दक्षिण सोलापूर) ज्योती बाबर (गादेगाव-पंढरपूर)
    ज्योती माळी (मळेगाव-बार्शी) अर्चना शिंदे ( चाकोरे-माळशिरस) मनिषा भांगे ( कंदर-करमाळा मनिषा लेंगरे (पापनस- माढा) माधुरी मिसाळ( चिकणे-सांगोला) राणी ढेकळे (देगाव-मंगळवेढा) सिमा खारे ( म्हैसगाव-माढा )यांना चंचल पाटील व रेखा राऊत त्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.

    प्रशासकीय सेवेत आल्यापासून सलग चौथा वाढदिवस मी सोलापूर मध्ये साजरा करीत असुन जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, सभापती, सरपंच, ग्रामसेवक यांनी चांगले सहकार्य करीत असल्याचे भावना व्यक्त करुन गावच्या विकासात सरपंचाचे मोठे योगदान असुन गावासाठी ध्येयाने काम करा प्रशासन आपणास सर्वोतोपरी मदत करेल असे सांगितले.यावेळी सरपंच संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अँड.विकास जाधव यांनी चंचल पाटील ह्या जिल्हा परिषदमध्ये सक्षमपणे काम करीत असुन प्रत्येक तालुका व गावाचा अभ्यास सरपंचाना विशेषतः महिला सरपंचाना ताकत देत आहेत असल्याचे सांगितले.

    उपस्थित सरपंचाचे स्वागत महिला जिल्हाध्यक्ष कविता घोडके पाटील यांनी केले आभार जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख यांनी मानले.