पंचायत समिती सभापतींना जिल्हा परिषदेचा निधी द्या; निवेदनाद्वारे मागणी

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंचायात समिती सभापतींना जिल्हा परिषदेचा निधी देण्यात यावा, अशी मागणी तालुका पंचायत समितीचे सभापती संघर्ष समितीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    सभापती संघर्ष समिती यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा परिषदेकडून सर्व तालुका सभापतींचे हक्क डावलले जात असल्याची वस्तुस्थिती अध्यक्षांसह आमदारांसमोर मांडण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजयकुमार देशमुख आणि अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले.

    निवेदन देताना रजनी भडकुंबे, सोनाली कडते, राणी कोळवले, रत्नमाला पोतदार, सुनंदा गायकवाड, अनिल डिसले , प्रेरणा मासाळ, अर्चना व्हरगर, विक्रमसिंह शिंदे या सभापतींसह सीईओ दिलीप स्वामी जि.प. वसंत देशमुख यांची उपस्थिती होती.