अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानला रामदास आठवलेंचा सल्ला; म्हणाले असा चालवा देशाचा कारभार

तालिबानने अफगाणिस्तानातील राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतल्यानंतर त्याचे नाव ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असे केले. रविवारी मध्यरात्री तालिबान्यांनी सरकार स्थापनेचीही घोषणा केली होती. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण “इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत” केले जाईल असे प्रतिपादन केले. तालिबानने लोकशाही पध्दतीने काम करावे असा सल्ला रामदास आठवलेंनी दिला. पाकिस्तान मध्ये देखील लष्कराने अनेक वेळा सत्ता ताब्यात घेतली असल्याचा संदर्भ देखील त्यांनी यावेळी दिला.

    पंढरपूर : अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खास सल्ला दिला आहे. तालिबान्यांनी देशाचा कारभार कशा पद्धतीने चालवावा याबाबत रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.

    तालिबानने अफगाणिस्तानातील राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतल्यानंतर त्याचे नाव ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ असे केले. रविवारी मध्यरात्री तालिबान्यांनी सरकार स्थापनेचीही घोषणा केली होती. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण “इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत” केले जाईल असे प्रतिपादन केले. तालिबानने लोकशाही पध्दतीने काम करावे असा सल्ला रामदास आठवलेंनी दिला. पाकिस्तान मध्ये देखील लष्कराने अनेक वेळा सत्ता ताब्यात घेतली असल्याचा संदर्भ देखील त्यांनी यावेळी दिला.

    तालिबानबाबत नेमकं काय म्हणाले रामदास आठवले – पाहा व्हिडिओ

    समान नागरी कायदा होणे गरजेचे आहे. आमचा या कायद्याला पाठींबा आहे. मुस्लिम समाजाने हा कायद्या आपल्या विरोधात आहे असे समजून अंगावर घेऊ नये. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी हम दो हमारा एक हा कायदा होणे गरजेचे असल्याची मागणी रामदास आठवले यांनी केली.