क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून रणजीतसिंह डिसले यांची शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती, असं आहे त्यांचं खरचं वाचणेनेबल प्रोफाईल

क्यूआर कोडेड (QR coded books) पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर (Announced) झाला आहे.

सोलापूर : जगभरातील १४० देशांतील १२ हजाराहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता (Final Winner) म्हणून रणजीतसिंह डिसले ( Ranjit Singh Disley) यांची घोषणा करण्यात आली आहे. क्यूआर कोडेड (QR coded books) पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर (Announced) झाला आहे.

सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार(Global Teacher Award) जाहीर झाला आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार पटकावणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक आहेत. ग्लोबल टीचर प्राईझ करिता जगभरातून आलेल्या १२ हजारहून अधिक नामांकनातून शेवटच्या फेरीत १० जण दाखल झाले. भारतातील एकमेव शिक्षक यावर्षी टॉप १० मध्ये पोहचला आहे. तसेच काल ३ डिसेंबर रोजी अंतिम विजेता कोण ठरणार हे त्याचा निकाल समोर आला आहे. तसेच जगातील सर्वोत्तम शिक्षक आपल्या सर्वांसमोर आले आहेत.

हे आहेत जगातील टॉप 10 टीचर्स

ग्लोबल टीचर प्राईझ करिता जगभरातून आलेल्या 12 हजारहून अधिक नामांकनातून शेवटच्या फेरीत…

Ranjitsinh Disale यांनी वर पोस्ट केले रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ग्लोबल टीचर पुरस्कार दिला जातो. सात कोटींचा हा पुरस्कार रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी याची घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले असल्याने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.

दिल्ली येथील कार्यक्रमात लेट्स क्रॉस द बॉर्डर या शैक्षणिक प्रोजेक्ट बद्दल सादरीकरण करतानाचा व्हिडिओ

जगातील सर्वात अशांत देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत,पाकिस्तान, इस्त्रायल, पॅलेस्टाईन, इराक , इराण या देशांतील मुलांमध्ये शांततेची बीजे रोवून १५००० मुलांची पीस आर्मी तयार करणाऱ्या प्रोजेक्टचे सादरीकरण मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिल्ली येथे आयोजित परिषदेत करण्याची संधी डिसले यांना मिळाली.

दिल्ली येथील कार्यक्रमात लेट्स क्रॉस द बॉर्डर या शैक्षणिक प्रोजेक्ट बद्दल सादरीकरण करताना

Ranjitsinh Disale यांनी वर पोस्ट केले मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०