Funeral performed by family in the morning; At night, he returned home alive

मृत महिलेच्या कुटुंबियांनी तिती हत्या केली. यानंतर नातेवाईकांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच आरोपी नातेवाईकांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर पोलिसांनी जळती चिता विझवून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालातच मृत्यू मागचे नेमकं कारण समोर येईल.

    माळशिरस : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras) येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील स्मशानभूमीत विवाहित महिलेवर अंत्यसंस्कार (Funeral) सुरू असताना अचानक पोलीस आले. पोलिसांना पाहताच नातेवाईकांनी जळती चिता सोडून घटना स्थळावरून धुम ठोकली. यानंतर पोलिस तपासात धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

    मृत महिलेच्या कुटुंबियांनी तिती हत्या केली. यानंतर नातेवाईकांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच आरोपी नातेवाईकांनी घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर पोलिसांनी जळती चिता विझवून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालातच मृत्यू मागचे नेमकं कारण समोर येईल.

    याप्रकरणी पोलीसांनी महिलेच्या चार नातेवाईकांना अटक केली आहे. नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी, पीडितेनं आत्महत्या केल्याचा बनाव रचत कोणालाही न सांगता गुपचूप अंत्यसंस्कार उरकण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणाचा पुढील तपास माळशिरस पोलीस करत आहेत.