पंढरपूर पोटनिवडणूक आचार संहीता शिथिल करा ; जि.प.अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांची मागणी

गेल्या वर्षी कोरोना संसर्ग प्रतिबंधीत करण्यासाठी जिल्हयात लॉकडाऊन करण्यात आले होते.२०१९-२० -२१ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूका घेण्यात आल्या , तसेच २०२० मध्ये पदवीधर ,शिक्षक , स्थानिक ग्रामपंचायात निवडणूक आचारसंहीतेमूळे जि.प.कडे प्राप्त झालेला निधी खर्च करता आला नाही.२५ मार्च रोजी बजेटची सभा आयोजीत करण्यात आली आहे.

    सोलापूर : सोलापूर शहर जिल्हयातील आचार संहीता शिथील करण्याची मागणी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांनी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे केली आहे. पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीमूळे शहर जिल्हयात लागू झालेल्या आचारसंहीतेमूळे प्रशासकीय विकासकामांना फटका बसणार असल्याचे अध्यक्ष कांबळे यांचे म्हणणे आहे.

    अध्यक्ष कांबळे यांनी दिलेल्या माहीती नुसार गेल्या वर्षी कोरोना संसर्ग प्रतिबंधीत करण्यासाठी जिल्हयात लॉकडाऊन करण्यात आले होते.२०१९-२० -२१ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूका घेण्यात आल्या , तसेच २०२० मध्ये पदवीधर ,शिक्षक , स्थानिक ग्रामपंचायात निवडणूक आचारसंहीतेमूळे जि.प.कडे प्राप्त झालेला निधी खर्च करता आला नाही.२५ मार्च रोजी बजेटची सभा आयोजीत करण्यात आली आहे. आचारसंहीतेमूळे निधी शिल्लक राहत आहे. त्यामूळे पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघा पुरतेचं निवडणूक आचारसंहीता मर्यादीत ठेवण्यात यावी आशी मागणी अध्यक्ष कांबळे यांनी केली आहे.

    सदस्या रेखा राऊत यांचे निवेदन
    पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकमूळे प्रशासकीय कामांना ब्रेक लागला आहे. सातत्याने लागणाऱ्या निवडणूका आणि कोरोनामूळे कामे होत नसल्याचे सदस्या रेखा राऊत यांनी निवेदनात म्हटले आहे.जिल्हयातील आचारसंहीता शिथिल करण्यात यावी आशी मागणी निवडणूक आयोगाकडे त्यांनी केली आहे