पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंध शिथिल

    पंढरपूर / राजेश शिंदे : पंढरपूरसह पाच तालुक्यातील निर्बंध आता हटवण्यात आले असून सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. याबाबत आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा नवा आदेश जारी झाला आहे.

    पंढरपूर, माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा या तालुक्यांसाठी दहा दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती. पण आता उद्यापासून अत्यावश्यक सेवेत नसलेली सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत ही दुकाने चार वाजेपर्यंत खुली राहणार असून शनिवार आणि रविवार पूर्ण बंद राहणार आहेत.

    अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. शासकीय कार्यालयासह परवानगी दिलेली खाजगी कार्यालये ५० क्षमतेने सुरु राहणार आहेत. सायंकाळी चारनंतर तसेच शनिवार रविवार या दिवशी ही सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी (दि. 22) सायंकाळी जारी केले आहेत.