‘ओबीसी के सन्मान मेंं; भाजपा मैदान में’; अकलूजसह माळशिरस तालुक्यात आरक्षणासाठी रास्ता रोको

    अकलूज : राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाचा बळी देऊन ओबीसी समाजाला अंधःकारात ढकलले आहे. परंतु, भाजप ओबीसींच्या पाठीशी खंबिरपणे उभा असून, आरक्षण मिळेपर्यंत सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलने केली जातील, असा इशारा आज अकलूज येथे माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी दिला.

    भाजपने राज्यभर राबवलेल्या चक्काजाम आंदोलनाला आज अकलूज येथे मोठा प्रतिसाद मिळाला. आमदार रणजितसिंह मोहीते पाटील, राम सातपुते, जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहीते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अकलूजमधील गांधी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य अरुण तोङकर, सुनंदा फुले, प्रताप पाटील, चंद्रकांत काकुळे, संदिप घाङगे, फातिमा पाटावाला, हनुमंत सरगर, बाजीराव काटकर संजय गोरवे मुक्तहार कोरबू शांतिलाल कारंडे  कल्पना कुलकर्णी जांलिदर फुले अरुण खडागळे कलाम शेख यशवंत सांळुखे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

    सातपुते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये यापूर्वी ज्या जागांवर ओबीसी उमेदवार होते, त्या जागांवर येत्या निवङणुकांमध्ये भाजप ओबीसी उमेदवारच देणार आहे. आघाङी सरकार हे तिघाङीतून बिघाङी झालेले सरकार असल्यामुळे यांच्याकडे ठोस निर्णय क्षमता नाही. पवारांचे राजकारण तर सुङाचे राजकारण असून या सुङबुद्धीनेच त्यांनी माळशिरस तालूक्याचा विकास रोखुन धरला आहे. अकलूज व नातेपुते या गावांच्या नगरपंचायत व नगर परिषदेच्या मंजुरी अङवून ठेवल्या आहेत. आरक्षणासाठी भाजप कायम ओबीसींच्या पाठीशी ठाम उभा राहील. आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना निवेदन देण्यात आले.