रोटरीने जागतिक पातळीवर पोलिओ निर्मूलन उपक्रम राबवले : मेथन

    अकलुज : रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाभावी संस्था असून, रोटरीने जागतिक पातळीवर पोलिओ निर्मूलन, साक्षरता असे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अकलुजच्या शाखेने मानवी जीवनाची मूल्ये जोपासणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करुन त्यांच्या कार्याला कौतुकाची थाप देत पाठबळ देण्याचे काम केले असल्याचे रोटरी क्लबचे प्रांतपाल व्यंकटेश मेथन यांनी सांगितले.

    अकलुज येथील कृष्णप्रिया हाॅलमधे रोटरी क्लब अकलुजच्यावतीने कृषीदिन,डाॅक्टर्स डे,चार्टर्ड डे दिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुक्यातील १२ कृतिशील शेतकरी,५६ हाॅस्पिटलमधील डाॅक्टर्स व त्यांचे स्टाफ असे एकुण ४९० जणासह १० चार्टर्ड अकौंटंट यांचा सन्मान अकलूजच्या सरपंच पायल मोरे व प्रांतपाल व्य॔कटेश मेथन यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नुतन अध्यक्ष नितीन कुदळे,सचिव गजानन जवंजाळ,सदस्य बबनराव शेंडगे, सुशिल व्होरा, कमलेश शहा,आशिष गांधी,गुरुदेव वैद्य,नितीन दोशी,दिपक फडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

    यावेळी निर्मलादेवी काटकर(तोंडले),आनंदराव जाधव (पिलीव),अविनाश देशमुख(देशमुखवाडी),विठ्ठल बंडगर (माळशिरस),सचिन गायकवाड(शंकरनगर),शिरीष दोशी व विरेंद्र कुरुडकर(अकलुज),युसुफ तांबोळी(आनंदनगर), पृथ्वीराज भोंगळे(माळीनगर),विकास पिसे(बोरगाव), भागवत पवार(सदाशिवनगर)या कृतीशील शेतक-यासह चार्टर्ड अकौंटंट सी.आर दोशी, मयुर फडे,शशिल गांधी, अमित दोशी,सुरज पिसे,प्रतापराव देशमुख,संदेश गांधी, विक्रांत माने देशमुख, अनिल तेळवे,केतन ओसवाल तर वैद्यकीय क्षेत्रातील डाॅ.एम.के.इनामदार,डाॅ.धनेश गांधी, डाॅ.निनाद फडे,डाॅ.विवेक गुजर,डाॅ.समीर बंडगर,डाॅ.अतुल गांधी,डाॅ.श्रेणिक शहा,डाॅ.मानसी देवडीकर,डाॅ.बाहुबली दोशी,डाॅ.नितीन राणे, डाॅ.समीर दोशी,डाॅ.श्रीकांत हेगडे, डाॅ.संतोष खडतरे याच्यासह तालुक्यातील डाॅक्टर्स,लॅब टेक्नीशन,परीचारीका,ब्रदर्सचा सन्मान करण्यात आला.