solapur Zp

जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत जिल्हयात ३० हजार ६७२ घरकुलांची बांधणी पुर्ण करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यशासन पुरुस्कृत योजनेंचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्री, रमाई, शबरी आवास योजनेतुन ६५ हजार घरकूलांना मंजूरी देण्यात आली आहे. ४६ हजार लाभार्थ्य।ना पहीला हप्ता देण्यात आला आहे.

    कोरोना लॉकडाऊन मध्ये सोलापूर जिल्हा परिषद सदस्यांना सुमारे २०० कोटी पर्यंतची कामे देण्यात येत आहेत. यातील ग्रामपंचायात विभागाच्या ४१ कोटी पर्यंतच्या प्रमा देण्यात आल्या आहेत. लघुपाटबंधाऱ्याच्या वर्कऑर्डर आणि प्रमावरुन सदस्यांमध्ये घमासान सुरु आहे. ३७ कोटी पर्यंतची प्रमा लपा विभागाने तयार केली आहे.

    समाजकल्याण विभागातील दलितवस्ती सुधारसाठी ५५ कोटी , ग्रामपंचायातच्या १५ वित्त आयोगातून १५ कोटी ८४ लाख, जनसुविधा १६ कोटी,नागरी सुविधा ७ कोटी , कृषी विभागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजना असा तालूकानिहाय निधी सदस्यानी सुचीत शिफारस केलेल्या स्थानिक ग्रामपंचायतीना मिळणार आहे. यातील कृषी विभागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वालंबन योजनेतील लाभार्थी निवडी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी देण्यात येणार आहे. हा निधी सन २०२०-२१सालातील देण्यात येत आहे. महीला व बाल कल्याण विभागाने पोटनिवडणूक आचारसंहीता पुर्व १३ कोटी अंगणवाडया दुरुस्तीची प्रमा देण्यात आली आहे.

    जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत जिल्हयात ३० हजार ६७२ घरकुलांची बांधणी पुर्ण करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यशासन पुरुस्कृत योजनेंचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्री, रमाई, शबरी आवास योजनेतुन ६५ हजार घरकूलांना मंजूरी देण्यात आली आहे. ४६ हजार लाभार्थ्य।ना पहीला हप्ता देण्यात आला आहे.ग्रामपंचायत विभागाच्या १५ वित्त आयोग निधीतून सदस्यांना १५ कोटी,जनसुविधा १६ कोटी,नागरि सुविधा ७ कोटी,तीर्थक्षेत्र विकास निधीतून ५ कोटीचा निधी देण्यात आला आहे.