मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी  भाजपाकडून समाधान औताडे यांना उमेदवारी

समाधान औताडे हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले असून बांधकाम व्यवसायिक आहेत. तसेच ते साखर निर्मिती उद्योगात कार्यरत आहेत. सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालकपद ते भूषवित असून सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत

    मुंबई: पंढरपूर येथील मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून समाधान औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय सांसदीय मंडळाने ही उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

    साखर निर्मिती उद्योगात कार्यरत
    समाधान औताडे हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले असून बांधकाम व्यवसायिक आहेत. तसेच ते साखर निर्मिती उद्योगात कार्यरत आहेत. सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालकपद ते भूषवित असून सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून औताडे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंगळवेढा तालुक्यात त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य, वैद्यकीय तसेच रोजगार शिबिरांचे आयोजन केले आहे. लॉकडाऊन काळात औताडे यांनी विविध माध्यमातून गरजू समाजघटकांना सहाय्य केले आहे. तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठीही औताडे विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत असतात