सोलापूर जिल्ह्यात ३६ हजार घरकुलांना मंजुरी

  सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यात 36हजार 118 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, 34 हजार 793 लाभार्थींना पहिला हप्ता जारी करण्यात आला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे. याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचा अहवाल प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे.

  सोलापूर जिल्ह्यासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ ते २०२०-२१ अखेर ५००७१ उद्दिष्ट प्राप्त होते. त्यापैकी ८८२३ लाभार्थींना जागा उपलब्ध नाही. त्यामध्ये १७५१ लाभार्थ्यांना विविध योजनांमधून जागेचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरीत ७०७२ लाभार्थ्यांना जागा उपलब्ध होऊ शकत नाही. याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

  ५००७१ उद्दिष्टामधून ५३५९ लाभार्थी कायमस्वरूपी प्रतिक्षा यादीतून कमी (REMAND) करण्यात आले आहेत. एकूण ३६,११८ लाभार्थीना २०२०-२१ अखेर मंजूरी देण्यात आली आहे. १५२२ लाभार्थी तात्पुरते स्थलांतरीत आहेत.

  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०१६-१७  ते २०२०-२१ अखेर

  – ३६,११८ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत त्यापैकी ३४७९३ घरकुलांना पहिला

  – हप्ता वितरीत करण्यात आला आहे. उर्वरीत १३२५ लाभार्थ्यांना हप्ता वितरीत करावयाची

  – प्रक्रिया चालू आहे त्यापैकी २२२१५ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.

  राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण २०१६-१७ ते २०२०-२१ अखेर १५२५ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मंजूर लाभार्थ्यापैकी १४८३५ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी १२०२३ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी डेमो हाऊस मंजूर करण्यात आले असून १० डेमो हाऊस सुरू करण्यात आली व ४ पूर्ण करण्यात आले आहे.

  ६) आवास प्लस जॉब कार्ड मॅपिंगमध्ये १६०६१९ (९५.७० %) जॉब कार्ड मॅपिंग करण्यात आले आहे.

  राज्य शासन स्तरावरून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जुन २०२१ पर्यंत महाआवास अभियान राबविण्यात आले. महाआवास अभियाना कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत १३१९१ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी १२२६४ घरकुलांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. व ३२८१ घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत.

  तसेच राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीण अंतर्गत २०८ घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. तसेच एकुण मंजूर १५२४८ घरकुलांपैकी २०२४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता अभियान कालावधीत वितरीत करण्यात आला आहे व ८४४ घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत.

  महाआवास अभियान कालावधीत केंद्र व राज्य पुरस्कृत योजनेची ४१२५ घरकुले पुर्ण करण्यात आली आहेत.

  पुर्ण झालेल्या घरकुलांना सौभाग्य योजनेतुन वीज कनेक्शन, जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी, उज्वला योजने अंतर्गत गॅस कनेक्शन, महात्मा गांधी रोजगार हमी योजना ग्रामीण व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचा लाभ देण्यात आला.