सोलापूर जिलहयात १२२ अंगणवाडया बांधणीला मंजूरी ; १३ कोटींचा निधी वितरण

अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक अंगणवाडया

    सोलापूर : जिल्हयात १२२ अंगणवाडया नव्याने बांधण्यासाठी प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. तसेच २५८ अंगणवाडया दुरुस्ती करण्यात येणार आहेत.नव्याने बांधण्यात येणाऱ्या अंगणवाड्यासाठी १० कोटी ३७ लाख तर दुरुसत्तीकरिता २कोटी ५८ लाखांचा निधी देण्यात आला आहे. अकलकोट तालूक्यात सर्वाधीक अंगणवाडया नव्याने बांधण्यात येणार असल्याची माहीती महीलाबाल कल्याण सभापती स्वाती शटगार यांनी दिली आहे.

    अकलकोट अंगणवाडया २२ ,१कोटी ८७ लाख ,बार्शी ७, ५९लाख ५० हजार,वैराग १२, १ कोटी २ लाख , करमाळा ५ , ४२ लाख ५० हजार, माढा- कुर्डवाडी १ , ८ लाख ,५० हजार , टेंभूर्णि ४, ३४ लाख ,माळशिरस २, १७ लाख, अकलूज ३ , २५ लाख ५० हजार, मंगळवेढा १२, १ कोटी २ लाख, मोहोळ १९ , १कोटी ६१लाख उत्तर सोलापूर ४, ३४ लाख , पंढरपूर १०, ८५ लाख, संगोला २, १७ लाख ,कोळा २, १७ लाख,दक्षिण सोलापूर १७ ,१ कोटी ४४ लाख , आशी तालूकानिहाय अंगणवाडयाची संख्या अणि बांधणीसाठी देण्यात आलेली निधीची रक्मम आहे.जिल्हा नियोजन मंडळाकडून हा सन २०२०-२१ सालातील निधी देण्यात आला आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी अंगवाडी इमारतीसाठी ८ लाख ५० हजार निधी देण्यात येणार आहे. ८ वर्षपूर्ण झालेल्या अंगवाडी दुरुस्तीसाठी मंजूर अंगणवाडयाना प्रत्येकी १ लाखांचा निधी देण्यात येणार आहे.

    सोलापूर जिल्हयातील नव्या १२२ अंगणवाड्या आणि दुरूस्ती २५८ अंगणवाडी बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सुमारे १३ कोटी पर्यंतचा निधी जिल्हा नियोजन मंडळाकडून देण्यात आला आहे. लवकरचं बांधकामाला सुरुवात होईल

    स्वाती शटगार , सभापती महीला व बाल कल्याण समिती जि.प.