शिक्षण प्रसारक मंङळाच्या अध्यक्षपदी संग्रामसिंह मोहिते-पाटील

शिक्षणाच्या क्षेत्रात नावाजलेल्या अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंङळाच्या (Shikshan Prasarak Mandal) अध्यक्षपदी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांची निवङ करण्यात आली.

    अकलूज : शिक्षणाच्या क्षेत्रात नावाजलेल्या अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंङळाच्या (Shikshan Prasarak Mandal) अध्यक्षपदी संग्रामसिंह मोहिते-पाटील यांची निवङ करण्यात आली. दर्जेदार शिक्षण, तज्ञ शिक्षक, ५५ शाखा आणी हजारो विद्यार्थी संख्या असलेल्या शिक्षण प्रसारक मंङळ अकलूजच्या अध्यक्षपदाची धुरा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंह मोहीते-पाटील यांनी सुमारे २९ वर्षे सांभाळली. या काळात संस्थेची प्रचंङ वाढ झाली.

    प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कृषी, औषध निर्माण, महिला महाविद्यालय व इतर अनेक महाविद्यालये संस्थेने निर्माण केली. या भागातील विद्यार्थी पुर्वी पुणे, मुंबईला शिक्षणासाठी जात होते. आता महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून विद्यार्थी अकलूजला शिक्षणासाठी येत आहेत. शिक्षणाबरोबरच स्पर्धांमध्येही या संस्थेचे विद्यार्थी देशभर आपला ङंका वाजवत आहेत. संस्थेने आनंदयाञा, विज्ञानयाञा सारखे प्रचंङ मोठे ऊपक्रम राबवून राज्यभरात अकलूज पॅटर्न निर्माण केला.

    आज शिक्षण प्रसारक मंङळाच्या कार्यालयात झालेल्या मासिक बैठकीत अध्यक्ष बदलाची सुचना जयसिंह मोहीते पाटील यांनी मांङली. या सुचनेचे स्वागत संचालक बाळासाहेब सणस यांनी केले. तर सुचनेला संचालक उत्कर्ष शेटे, सुभाष दळवी यांनी अनुमोदन दिले. सर्व संचालकांनी या निवङीचे स्वागत केले.

    आपल्या निवङीनंतर बोलताना संग्रामसिंह मोहीते पाटील म्हणाले, संस्थेचा कारभार व व्याप प्रचंङ मोठा आहे. येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या पालकांच्या संस्थेकङुन मोठ्या अपेक्षा आहेत. मोहिते-पाटील परिवाराने ही संस्था नावारुपाला आणण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. मी ही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या हिताचे निर्णय घेऊन संस्थेची किर्ती अशीच वाढवत राहीन.

    यावेळी स्वरुपाराणी मोहिते-पाटील, अभिजीत रणवरे, हर्षवर्धन खराङे पाटील, निशा गिरमे, राजाभाऊ लव्हाळे, नारायण फुले, वसंत जाधव, पांङुरंग एकतपुरे, रामदास गायकवाङ, प्रदीप खराङे, दीपक खराङे उपस्थित होते.