…अन् ‘या’ गावात भरली शाळा

    सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची शाळा भरली. त्यात दोन वर्षांनी मुली मुळाक्षरे गिरविण्यात रमल्या. प्राथमिक शाळेतील पहिली ते तिसरीपर्यंतच्या मुलींना मुळाक्षरे शिकविण्यात जिल्हा परिषद शिक्षक शिवानंद भरले गुरुजी मग्न झालेले आहेत.

    दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील मुलांची शाळा भरलीच नाही. राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोनामुक्त गावात मुलांची शाळा सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. कोरोनाच्या भितीने बंद असलेली शाळा आता भरली आहे. शाळेतील मुलं मोठ्या आत्मविश्वासाने शाळेतील पाठ गिरवताना दिसून येत आहेत.

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तुर गावातील जिल्हा प्राथमिक शाळेत मुळाक्षरे गिरवताना गुरुजींबरोबर मुलींसुध्दा तितक्याच रमलेल्या दिसून आल्या. दोन वर्षानंतर भरलेली शाळा पाहून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.