सीईओंकडून स्वच्छता कार्यालयाची झडती ; वादग्रस्त फाईलीचे गौडबंगाल येणार उघडकीस

डेप्यूटी कॅफो सुर्वेकडे तपास

    सोलापूर : जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागातील १कोटी १९लाख ६० हजार रक्मेच्या व्यवहारात अपहार झालेल्या फाईल गायब करण्यात आल्या वरून सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे. सदस्यांचा आवाज चहूबाजूने घुमत असताना सीईओ दिलीप स्वामी यांनी अचानकपणे भेट देत स्वच्छता पाणी विभागाची झडती घेतल्याने खळबळ उडाली आहे. बंद कपाटात फाईल दडल्याची तेथील कर्मचाऱ्यांनी माहीती दिल्याने कपाट उघडण्यात आले. प्रारंभी कपाटाच्या चावी वरून बनवाबनवी करित असल्याची बाब सीईओ यांच्या निर्देशनास आली आहे. बहूचर्चीत गायब फाईल बंद कपाटात सापडल्याने थोड़ाफार दिलासा मिळाला असला तरी फाईलीचे गुढ वाढले आहे. फाईली मध्ये नेमके काय गौडबंगाल आहे. तपास करण्यासाठी डेप्यूटी कॅफो उत्तम सुर्वे यांच्याकडे फाईल सोपविण्यात आली आहे

    याबाबत माहीती आशी की, जिल्हा परिषद स्वच्छता व पाणी विभागाच्या वतीने जनजागृती करिता स्टीकर खरेदीत अर्थिक व्यवहारामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचे पत्र सामान्य प्रशासन डेप्यूटी सीईओ परमेश्वर राउत यांनी पत्र दिले आहे. स्वच्छता विभाग प्रमूख गोरख शेलार हे रजेवर होते. त्यांचा पदभार राऊत यांच्याकडे ५ ते १९ एप्रिल पर्यंत सोपविण्यात आला होता. या कालावधीत कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून राऊत यांना प्राप्त माहीतीनुसार आक्टोबंर २०१९ सालात १ कोटी १९ लाख ६० हजारांची ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी स्टीकर खरेदी करण्यात आले होते. पण खरेदी व्यवहारात फाईलवर संशायस टिप्पण्या लिहण्यात आल्या आहेत. टिपण्या लिहताना संबंधीत लिपीकांचा कोठे ही उल्लेख आढळला नाही. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहया एकाच दिवशी दाखविण्यात आल्या आहेत. एका कर्मचाऱ्याकडे या फाईलीची झेरॉक्स उपलब्द असल्याने हा घोटाळा उघडकीस आला असे डेप्यूटी सीईंओ राऊत यांचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना हि बाब निर्देशनास आणून दिली आहे.

    स्टीकर खरेदी करणाऱ्यांवरून मोठे वादळ जि.प.च्या सर्वसाधारण सभेत निर्माण झाले होते. भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी सभागृहात सदस्य उमेश पाटील,त्रिभूवन धाईंजे ,आनंद तानवडे यांनी केली होती. संशयास्पद व्यवहारावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र चौकशी समितीने निकाल काय लावला अथवा अर्थिक देवाण घेवाणमूळे कारवाई थांबवली का ? असा सवाल सदस्य उपस्थित करित आहेत..

    दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल सीईओ दिलीप स्वामी यांनी घेतली आहे. अर्थिक व्यवहारात शासनाच्या निकषांनुसार खरेदी करण्यात आली आहे ? सबंधीत लिपीकांनी फाईल सादर केली होती का ? परस्पर अधिकाऱ्यांनी फाईल तयार केली आहे. अशा विविध प्रश्नाची प्राथमिक पडताळणी करण्यात आली आहे.