Second break for Solapur Municipal Corporation Standing Committee Chairman Election! The intentions of the aspirants were thwarted

सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीला राज्य सरकारने दुसऱ्यांदा ब्रेक लावला. महापालिकेची 16 सदस्यीय स्थायी समिती आणि 12 सदस्यीय परिवहन समितीच राज्य सरकारने आदेश काढून बरखास्त केली. त्यामुळे आज होणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक पुन्हा एकदा टळली आणि इच्छुक उमेदवारांचे मनसुबे उधळले. स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड होते, मात्र ठाकरे सरकारच्या निर्णयाने सर्वांनाच झटका बसला.

    सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीला राज्य सरकारने दुसऱ्यांदा ब्रेक लावला. महापालिकेची 16 सदस्यीय स्थायी समिती आणि 12 सदस्यीय परिवहन समितीच राज्य सरकारने आदेश काढून बरखास्त केली. त्यामुळे आज होणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक पुन्हा एकदा टळली आणि इच्छुक उमेदवारांचे मनसुबे उधळले. स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे पारडे जड होते, मात्र ठाकरे सरकारच्या निर्णयाने सर्वांनाच झटका बसला.

    गेल्या आठवड्यात सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीची प्रक्रिया सुरु असताना ऐनवेळी राज्य सरकारने ती आठ दिवसांसाठी तहकूब केली. त्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाच्या विरोधात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने आहे त्या स्थितीत निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले होते.

    बैठकीला भाजपच्या मेनका राठोड या गैरहजर असल्याने विरोधक असलेल्या शिवसेनेचे पारडे जड होते. मात्र ऐनवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी राज्य सरकारचे पत्र वाचून दाखवले आणि सभापतीपदाची स्वप्ने पाहणाऱ्या नगरसेवकांवर मागे फिरण्याची वेळ आली.

    राज्य सरकारने 16 सदस्यीय स्थायी समितीच बरखास्त केली आहे. त्यासोबतच परिवहन समितीही बरखास्त करण्यात आली आहे. भाजपकडून अंबिका पाटील यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता, तर शिवसेनेकडून अमोल शिंदे आणि मनोज शेजवाल यांनी अर्ज दाखल केला होता.