Incoming NCP continues; BJP office bearers from Navi Mumbai join NCP

विधानसभा पोटनिवडणुकीत आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांबरोबरच आता बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. निवडणूक प्रचार ऐन रंगात आला असताना आता मतदारसंघातील बड्या नेत्यांची एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दोन नेते कुण्या एका पक्षाचे नाहीत तर राष्ट्रवादी आणि भाजपाचे असल्याने तर्क वितर्कही लढविले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार संजयमामा शिंदे आणि माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे.

    पंढरपूर : विधानसभा पोटनिवडणुकीत आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांबरोबरच आता बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. निवडणूक प्रचार ऐन रंगात आला असताना आता मतदारसंघातील बड्या नेत्यांची एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दोन नेते कुण्या एका पक्षाचे नाहीत तर राष्ट्रवादी आणि भाजपाचे असल्याने तर्क वितर्कही लढविले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार संजयमामा शिंदे आणि माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे.

    महत्वाची बाब म्हणजे ही बैठक कल्याण काळे यांच्या उपस्थितीत पार पडल्याचीही चर्चा सुरु आहे. आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. त्यामुळे या गुप्त बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, या बैठकीत नेमकं काय शिजलं हे मात्र गुलदस्त्यात आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होत आहे.

    पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालत आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्र आणले. आवताडेंसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी आमदार संजय शिंदे हे देखील या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील भाजप उमेदवाराला निवडून देणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी या मतदारसंघाचा दौरा केला. मोहिते- पाटलांना मानणारा वर्ग या मतदारसंघात असल्यामुळे त्याचा फायदा होण्याची शक्‍यता आहे. आमदार संजय शिंदे यांना मानणारा वर्ग कमी असला तरी त्यांनी भगीरथ भालके यांच्या विजयासाठी खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, संजय शिंदे यांनी मंगळवेढा शहराबरोबर ग्रामीण भागात सक्रिय होत राष्ट्रवादीच्या उमेदवारास विजयी करण्याचे आवाहन करण्यास सुरवात केली.