खळबळजनक! जमीन नांगरताना सापडले मानवी सांगाडे ; माळशिरस तालुका येथील पंधरा सेक्शन परिसरातील घटना

माढा तालुक्यातील सापटणे येथील ढवळे पाटील यांनी शेती महामंडळ यांचे कडून सुमारे अडीचशे एकर जमीन संयुक्तीक करारांवर पुणे येथील हेड ऑफिस मध्ये पैसे भरुन जमीन कसायला सुरुवात केली आहे. मात्र सदर जमीन नांगरताना हा प्रकार उघडकीस आला आहे.   यावेळी घटनास्थळी वंचित बहुजन आघाडी श्रीपूर येथील कार्यकर्ते यांनी समक्ष भेट दिली व  पहाणी केली.

    अकलूज : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा अंतर्गत जमीन कसायला दिलेल्या शेतकरी जमीन सुपीक व लेव्हल करत असताना पंधरा सेक्शन हद्दीत जमीन नांगरत करतं असलेल्या त्या जमीनीत मानवी सांगाडे सापडले आहेत. सदर सांगाडे कवठी हाडे ठिसूळ झालेल्या अवस्थेत नांगरणी करताना सापडले आहेत. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. तीस चाळीस वर्षांपूर्वी या भागात रहाणारे लोक मयत व्यक्तींना शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा अंतर्गत पडिक जागेत दफन करत असावेत, असा कयास लावण्यात येत आहे. शेती महामंडळातील कामावर असणारे स्थानिक कामगार या परिसरात रहायला होते  त्याकाळी पक्की स्मशानभूमी नसल्याने व सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गोरगरीब अशिक्षित मजूर मयत व्यक्तींना पुरत असत. त्यातीलच हे सांगाडे असावेत, असे बोलले जात आहे.

    माढा तालुक्यातील सापटणे येथील ढवळे पाटील यांनी शेती महामंडळ यांचे कडून सुमारे अडीचशे एकर जमीन संयुक्तीक करारांवर पुणे येथील हेड ऑफिस मध्ये पैसे भरुन जमीन कसायला सुरुवात केली आहे. मात्र सदर जमीन नांगरताना हा प्रकार उघडकीस आला आहे.   यावेळी घटनास्थळी वंचित बहुजन आघाडी श्रीपूर येथील कार्यकर्ते यांनी समक्ष भेट दिली व  पहाणी केली.  “मानवी सांगाडे आहे त्या जमिनीत व्यवस्थीत दफन करा, यातील दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित ठेवण्यात यावी”, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मात्र शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा येथील कर्मचारी भालचंद्र शिंदे सुरक्षा रक्षक विलास महाडीक यांनी “तुमचे म्हणणे पुणे येथे हेड ऑफिसला कळवा, आम्हाला येथे काही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हेड ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील” अशी माहिती दिली. घटनास्थळी वंचित बहुजन आघाडीचे शैलेश शेंडगे,संदीप घाडगे, बंटी चंदनशिवे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

    या परिसरात रहाणारे व पूर्वी शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळ्यात काम करणाऱ्या येथील रहिवाशांना रहाण्यासाठी ही आठ एकर जमीन द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी केली आहे. पुणे हेड ऑफिस येथून पुढील निर्णय येईपर्यंत या आठ एकर क्षेत्रावर ढवळे पाटील यांनी ताबा घेऊ नये, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी श्रीपूर पोलिस चौकीचे  पोलिस कर्मचारी धनाजी झगडे गायकवाड बंदोबस्तास उपस्थित होते मानवी सांगाडे सापडले याची चर्चा परिसरात झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. कोणताही वाद संघर्ष न होता पोलिस व कार्यकर्ते आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरण व्यवस्थीत हाताळले. आता पुणे हेड ऑफिस मधून काय निर्णय व आदेश येतोय याकडे स्थानिक रहिवासी यांचे लक्ष लागले आहे.