संवेदनशील मुख्यमंत्री! उद्धव ठाकरेंमुळे वाचले ‘त्या’ अपघातग्रस्त तरुणांचे प्राण

काल दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत पंढरपूरकडे रवाना झाले होते. विशेष, म्हणजे यावेळी ते स्वतः गाडी चालवत होते. या प्रवासादरम्यान पंढरपूर जवळीच करंबक गावाजवळ दोन दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याची माहिती त्यांना मिळाली. ही माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकाची गाडी व रुग्णवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. रुग्णवाहिका वेळेत मिळाल्यानं या दोन्ही तरुणांना लवकर उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले आहेत.

  सोलापूर : आषाढी एकदशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कालच पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत होते. या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानामुळं दोन अपघातग्रस्त तरुणांचे प्राण वाचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळं सध्या त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत. काल दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत पंढरपूरकडे रवाना झाले होते. विशेष, म्हणजे यावेळी ते स्वतः गाडी चालवत होते. या प्रवासादरम्यान पंढरपूर जवळीच करंबक गावाजवळ दोन दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याची माहिती त्यांना मिळाली.

  नेमकं काय घडलं?

  दरम्यान ही माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकाची गाडी व रुग्णवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. रुग्णवाहिका वेळेत मिळाल्यानं या दोन्ही तरुणांना लवकर उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले आहेत. मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी या दोन तरुणांच्या प्रकृतीची चौकशी देखील केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळं सोशल मीडियावरही त्यांचं कौतुक होताना दिसतंय.

  नीलम गोऱ्हे यांनी दिली माहिती

  शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही ट्वीट केलं आहे. यावेळी त्यांनी संवेदनशील मुख्यमंत्री असंही म्हटलं आहे. जनतेची काळजी असणारे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. पंढरपूरला महापुजेसाठी जात असताना करकंब गावाजवळ दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याचे कळाल्यावर स्वतःच्या ताफ्यातील रुग्णवाहिका त्यांच्या मदतीसाठी देण्याचे आदेश दिले, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

  याच घटनेची सोशल नेटवर्किंगवर चर्चा असून शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही ट्विट करुन याबद्दल माहिती देत मुख्यमंत्र्यांना संवेदनशील मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. “आतुरता पुन्हा विठ्ठल दर्शनाची… जनतेची काळजी असणारे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. पंढरपूरला महापुजेसाठी जात असतांना करकंब गावाजवळ दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याचे कळाल्यावर स्वतःच्या ताफ्यातील रुगणवाहिका त्यांच्या मदतीसाठी देण्याचे आदेश दिले… संवेदनशील मुख्यमंत्री,” असं गोऱ्हेंनी म्हटलं आहे.