मंदिरे पुन्हा खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून शंखनाद आंदोलन

    मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या अटी शिथिल करत जवळपास सर्व उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, मंदिरे पुन्हा खुली करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. याबद्दल मोहोळ तालुका व शहर भाजपच्या वतीने सोमवारी (दि. ३०) मंदिरासमोर शंखनाद आंदोलन केले.

    मंदिर असो अथवा मस्जिद, चर्च असो हा लोकांच्या श्रध्देचा, आस्थेचा विषय तर आहेच त्याचबरोबर हारवाले, प्रसादवाले, पुजारी, पूजेचे साहित्य देणारे अशा बऱ्याच जणांच्या उदरनिर्वाहाचा हा प्रश्न आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं हे उदरनिर्वाहाच साधन बंद आहे. राज्य सरकारने याचा संवेदशीलतेने विचार करत इतर बाबींप्रमाणे मंदिरे देखील उघडावी हीच आमची मागणी आहे. मंदिरे उघडल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही, असे भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण यांनी सांगितले.

    यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर, उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष लिंगराज निकम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर, तालुका सरचिटणीस मुजीब मुजावर, नागेश क्षीरसागर, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, माऊली भगरे, सागर लेंगरे, आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष पुजारी, युवा नेते दीपक गवळी, विशाल पवार, दीपक पुजारी, संतोष नामदे, सरचिटणीस विकास वाघमारे, दिनेश गडदे, शहर उपाध्यक्ष नवनाथ गाढवे, औदुंबर वाघमोडे, नावनाथ चव्हाण, युवा मोर्चा सरचिटणीस सागर वाघमारे, बालाजी गाढवे, द्रोणा लेंगरे, बालाजी खोत, रोहित इंगळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.