शरद पवार यांचा आज सोलापूर दौरा; महापालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढायची याचा निर्णय होण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरात दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलापूर महापालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेचे महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

  सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरात दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलापूर महापालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढायची याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेचे महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक आयोग कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेणार आहेत.

  काँग्रेस, शिवसेना करत राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणुका लढविली जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र याला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध नसला तरी नाराजी आहे. यावर आज पवार निर्णय घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेचं पवार आज सोलापुरात आल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतील. यावेळी महापालिकेची परिस्थिती समजून घेणार आहेत. कोणत्या कोणत्या वॉर्डात राष्ट्रवादी कमकुवत आहे याचा आढावा घेऊन पवार पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही देणार आहेत. तसेच महेश कोठे आज पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करू शकतील, असंही सूत्रांनी सांगितलं.

  पवारांचा दुसऱ्यांदा सोलापूर दौरा

  पवार दुसऱ्यांदा सोलापूरला येणार आहेत. या आधी ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापुरात आले होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देशमुख यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला होता. मात्र, यावेळी त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी टाळल्या होत्या.

  महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार

  पवारांच्या दौऱ्यात नगरसेवक महेश कोठे यांचा रखडलेल्या पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, पवारांचा 2 सप्टेंबर रोजीचा दौरा रद्द झाल्याने कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेशही रखडला होता. शिवसेनेचे नगरसेवक महेश कोठे यांना विभागीय आयुक्तांनी अपक्ष नगरसेवक मान्यता दिली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या कोटींचा पक्षबदल यानंतरही नगरसेवक पद अबाधित राहणार आहे. पूर्वी काँग्रेस तर आता शिवसेनेचे नगरसेवक असलेले महेश कोठे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे.