शेटफळ ग्रामीण रूग्णालयास १ कोटीचा सेसफंडातून ऑक्सिजनलाईन उभारणार ; सभापती विजयराज डोंगरे यांची माहिती

मोहोळ तालूक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाय योजना करा आशी सुचना मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना केली आहे. जिल्हाआरोग्यधिकारी डॉ.शितलकूमार जाधव यांना मोहोळ तालूक्यात कोरोना प्रतिबंधीत लसीकरण मोहीम करण्याची सुचना दिल्याचेही सभापती विजयराज डोंगरे यांनी सांगितले

    सोलापूर : मोहोळ तालूक्यातील शेटफळ ग्रामीण रूग्णालयास १ कोटी पर्यंतचा जिल्हा परिषद सेसफंड निधी उपलब्द्ध करुन देणार असल्याची माहीती बांधकाम अर्थ समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी दिली आहे.

    पुढे बोलताना सभापती डोंगरे म्हणाले सध्या मोहोळ तालूक्यात कोरोना प्रार्दूभाव दिवसेंदिवस वाढत आहे. शेटफळ ग्रामीण रूग्णालयात सोयी सुविधेचा अभाव असल्याने नाहक भटकंती नागरिकांना करावी लागत आहे. कोरोना रूग्णाच्या सेवेसाठी जि.प.सेसफंडाच्या निधीतून ऑक्सीजन लाईन उभारणार आहे. ३० बेडची क्षमता असलेल्या रूग्णालयाकडे सातत्याने जिल्हाशल्यचिक्तसीक कार्यालयाचे दुर्लक्ष झाले आहे. वारंवार कर्मचाऱ्यांची मागणी करून देखील मनुष्यबळ देण्यास सिव्हीलसर्जन डॉ.प्रदीप ढोले यांनी दुर्लक्षीतपणा केला आहे. आ.यशवंतराव माने यांनी रूग्णालयास गेल्या सहा महीन्यापुर्वी भेट दिली होती. सोयी सुविधा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र आदयप पर्यंत सोयीसुविधा त्यांनी उपलब्द्ध करून दिल्या नाहीत.

    मोहोळ तालूक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाय योजना करा आशी सुचना मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना केली आहे. जिल्हाआरोग्यधिकारी डॉ.शितलकूमार जाधव यांना मोहोळ तालूक्यात कोरोना प्रतिबंधीत लसीकरण मोहीम करण्याची सुचना दिल्याचेही सभापती विजयराज डोंगरे यांनी सांगितले.