धक्कादायक! पोलिसानेच केला पोलिस मित्राच्या पत्नीवर बलात्कार, जबरदस्तीने ठेवले शरीर संबंध ; पोलीस दलातील खळबळजनक घटना

रवी भालेकर हा फौजदार चावडी पोलिसात पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहे.यापूर्वी तो सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत होता.त्याचा एक मित्र शहर पोलिस दलात कार्यरत आहे.दरम्यान,त्याचा पोलिस मित्र कोरोना पॉझिटीव्ह आला.त्यामुळे त्याला पोलिस मुख्यालयातील कोरोना सेंटरमध्ये उपचारास दाखल करण्यात आले.

    सोलापूर : पोलिसानेच सहकारी पोलीस मित्राच्या पत्नी सोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवून बलात्कार केल्याची घटना दि.२३ मे रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली.याप्रकरणी पीडित पोलीस पतीच्या पत्नीने फौजदार चावडी पोलीस ठाणे फिर्याद दाखल केली आहे.रवी मल्लिकार्जुन भालेकर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे.

    रवी भालेकर हा फौजदार चावडी पोलिसात पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहे.यापूर्वी तो सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत होता.त्याचा एक मित्र शहर पोलिस दलात कार्यरत आहे.दरम्यान,त्याचा पोलिस मित्र कोरोना पॉझिटीव्ह आला.त्यामुळे त्याला पोलिस मुख्यालयातील कोरोना सेंटरमध्ये उपचारास दाखल करण्यात आले.हीच संधी साधत रवी मित्राची घरी गेला.त्यावेळी मित्राची पत्नी एकटी होती.रवी याने घरात जात दाराची कडी लावली व माझे तुझ्यावर प्रेम आहे.तू मला आवडते असे म्हणत तिच्याबरोबर जबरदस्तीने बलात्कार केला.त्यानंतर त्या पोलिसाच्या पत्नीने फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीनंतर रवी यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसानेच आपल्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याच्या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.पोलीस दलात या घटनेबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पो.स.ई तळे या करीत आहेत.