सोलापूर शहर जिल्हयातील दुकाने बंद ; अत्यावश्यक सेवा असणार सुरु

सोलापूर ग्रामीण मध्ये मुख्यकार्यकारी आधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी १हजार २८ गावांना भेटी देणार आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक गावात प्रतिबंधित क्षेत्र तयार केले असून प्रतिबंधित क्षेत्रात दळणवळण व नागरिकांना संचारास बंदी घालण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडून ही कोरोना प्रतिबंधासाठी अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तरीही कोरोनाची रूग्णवाढ आटोक्यात येताना दिसून येत नाही.

    सोलापूर : सोलापूर शहर जिल्हयातील दुकाने ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिले आहेत. अत्यआवश्यक सेवेतील किराणा,भाजीपाला, डेअरी खादयपदार्थ दुकाने ,मेडीकल्स ,सुरु राहणार आहेत.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक धोरण हाती घेतले आहे. शहर जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने विविध क्षेञ प्रतिबंधीत करण्यात आले आहेत.

    सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वेळे पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु ठेवण्यात येणार आहेत. रात्री आठच्या नंतर कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार आहे.शहरीभागासाठी निर्बंधाचे आदेश मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांनी लागू केले आहेत.

    कारखाने आणि बांधकाम क्षेत्राला परवानगी देण्यात आली आहे. मात्र या परवानगीत कामगारांची राहाण्याची सोय करणे बंधनकारक करण्यात आले आहे.दुकाने बंद करण्याच्या निर्णयाला व्यापारीवर्गाकडून विरोध करण्यात येत आहे.५ पेक्षा आधिक व्यक्तीना एकत्रीत फिरणाऱ्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सोमवारी शहरातील चौकाचौकात कोरोना संसर्ग प्रतिबंधीत कारवाईसाठी पोलिस आणि मनपा कर्मचाऱ्यानी कारवाईचा बडगा उगारला आहे. दुकाने बंद करण्यात येत आहेत. यावेळी व्यापारी आणि कर्मचाऱ्यांनामध्ये किरकोळ बाचाबाची करण्यात आली .

    सोलापूर ग्रामीण मध्ये मुख्यकार्यकारी आधिकारी दिलीप स्वामी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी १हजार २८ गावांना भेटी देणार आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक गावात प्रतिबंधित क्षेत्र तयार केले असून प्रतिबंधित क्षेत्रात दळणवळण व नागरिकांना संचारास बंदी घालण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडून ही कोरोना प्रतिबंधासाठी अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तरीही कोरोनाची रूग्णवाढ आटोक्यात येताना दिसून येत नाही.

    या सर्व पार्श्वभूमीवर सीईओ स्वामी यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत शिवरत्न सभागृह येथे जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख व त्यांचे सहकारी अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत उद्या मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांनी व त्यांच्या अधिनस्त सहकारी अधिकारी आणि कर्मचारी तसेच तालूकास्तरावरील अधिकारी, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी यांनी एकाच दिवशी जिल्ह्यातील किमान एक हजार अठ्ठावीस गावांना गाव भेटी देऊन कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या सर्व अभियानाच्या कामकाजाचा आढावा घेणे, बाधीतांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, सुरू करण्यात आलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रात योग्य खबरदारी घेतली जात आहे का याची तपासणी करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे व हात धुणे या त्रिसूत्रीचा प्रभावी अंमल होतो किंवा नाही हे पाहणे, आशा सुचना देण्यात आल्या आहेत.