भाजपचे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश

    सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे व शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मड्डी वस्ती येथे झालेल्या कार्यक्रमात प्रणिती शिंदे व प्रकाश वाले व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

    यावेळी अविराज आनंदकर माजी नगरसेविका नंदा कांगरे, ऍड अमित आळंगे, लक्ष्मण विटकर, रवी कांगरे, दिनेश घोडके, श्रीशैल हुंडेकरी, रवी हुंडेकरी, नूरअहमद नालवार, चंद्रकांत टिक्के तिरुपती परकीपंडला, रावसाहेब चौगुले, सिद्धू निशानदार, राजेश कतारी, इसुब नदाफ, नितीन वाळेकर, केदार जत्ती, अल्पेश घोडके, दादा मंजेली, अजिंक्य पाटील, बाळासाहेब घोडके, श्रीशैल हिरेमठ, प्रभाकर सिंगराल, सोमनाथ मळेवाडी, अरुणा काबरे, निर्मला सोनकार, कोथिम्बिरे ताई, रमा सरवदे, जहांगीरा कतारी यांच्यासह अन्नपूर्णा महिला बचत गट, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, कॉंग्रेस पक्ष हा सर्व जातीधर्माचे, गोरगरिब, सर्वसामान्य जनतेचे काम करणारा पक्ष असून शहर उत्तर असू द्या. शहर दक्षिण असू द्या. कॉंग्रेस पक्षावर विश्वास ठेवून जे जे कॉंग्रेस पक्षात प्रवेश करतील त्यांचा सन्मान केला जाईल त्यांना न्याय देण्यात येईल. आज माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करते त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देते. लवकरच आगामी काळात महापालिका निवडणूक आहे. पक्ष बळकटीसाठी कामाला लागावे, असे आवाहन केले.