पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवा; सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादी नेत्यांना टोला

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक चांगलीच रंगात आली आहे. मंगळवेढा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सलगर गावात सभा घेतली. ही सभा पाहून मागील विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या सभेची सर्वांना आठवण झाली. यावरुन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवा असा टोला त्यांनी लगावला.

     पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक चांगलीच रंगात आली आहे. मंगळवेढा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सलगर गावात सभा घेतली. ही सभा पाहून मागील विधानसभा निवडणुकीत साताऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या सभेची सर्वांना आठवण झाली. यावरुन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवा असा टोला त्यांनी लगावला.

    उपमुख्यमंत्री अजित पवार गल्लोगल्ली फिरत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पावसात भिजण्यापेक्षा 35 गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोपही सदाभाऊंनी केला.

    देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली. पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपा विकासाच्या मुद्द्यांवरुन लढत आहे. पवार यांना पोटनिवडणुकीत काही देणेघेणे नाही. त्यांची नजर विठ्ठल सहकारी कारखान्यावर आहे. पवार घराणे राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढत असल्याचा घणाघातही सदाभाऊंनी केला.