सोलापूरमधील भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा कोरोनामुळे मृत्यू

  • भाजपाचे शहराध्य संजय वाईकर यांना कोरोनाची लक्षण आढळल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना सोलापूरच्या वाखारी कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु अचानक त्यांची तब्येत खालावल्याने संजय वाईकर यांना पंढरपूरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

सोलापूर – कोरोनाने देशात थैमान घातला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच काही आमदार आणि खासदारांनी कोरोनावर यशस्वी लढत देऊन मात केली आहे. कोरोनामुळे सोलापूरमधील भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचा मृत्यू झाला आहे. 

भाजपाचे शहराध्य संजय वाईकर यांना कोरोनाची लक्षण आढळल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना सोलापूरच्या वाखारी कोविड सेंटरमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु अचानक त्यांची तब्येत खालावल्याने संजय वाईकर यांना पंढरपूरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र कोरोनाशी त्यांचा लढा अपयशी ठरला आणि त्यांची प्राणज्योत मालवली आहे. सोलापूरयेथील रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

संजय वाईकर यांनी पत्रकारितेत अनेक वर्ष काम केले. ते शहरातील दैनिक निर्भिड आपल मतचे संपादक होते. भाजपाच्या माध्यामातूनही ते काम करीत होते. ३ वर्षांपूर्वी संजय वाईकर यांना भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी निवडण्यात आले.