solapur Zp

सोमवारी जिल्हयातील पंचायात समिती सभापतीनी आ.प्रशांत परिचारक, आ.विजयकुमार देशमूख यांच्यासह अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे जलसंधारणाचा निधी देण्यात यावा आशी मागणी केली होती. या मागणीला आमदारांसह अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मंगळवारी ( आजच्या) होणाऱ्या अर्थ समिती सभेच्या निर्णयाकडे पं.स. सभापतींचे लक्ष लागून राहीले होते.

    सोलापूर : सोलापूर जिल्हयातील पंचायात समिती सभापतीना निधी वाटपाच्या निर्णयाला अर्थ समितीनी तात्पूरती स्थगिती दिली आहे.अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ समिती खुल्या सभागृहात घेण्यात आली. ३०:५४ , ५०:५४ च्या हेड खालील निधी जिल्हा परिषद सदस्यांना प्रत्येकी तीन लाखां पर्यंतचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

    सोमवारी जिल्हयातील पंचायात समिती सभापतीनी आ.प्रशांत परिचारक, आ.विजयकुमार देशमूख यांच्यासह अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्याकडे जलसंधारणाचा निधी देण्यात यावा आशी मागणी केली होती. या मागणीला आमदारांसह अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मंगळवारी ( आजच्या) होणाऱ्या अर्थ समिती सभेच्या निर्णयाकडे पं.स. सभापतींचे लक्ष लागून राहीले होते. सभापतींच्या मागणीला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय अर्थ समितीत घेण्यात आला. या संदर्भातील निर्णयाची अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्याशी चर्चा करुन पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे.या समिती सभेस कॅफो अजयसिंह पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.