solapur Zp

-ऑक्सीजन बेडसाठी कर्मचाऱ्यांकडून निधीची आपेक्षा

  सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील बहुतांशी विभागातील कर्मचारी गेल्या दोन महीन्या पगारी पासून वंचीत आहेत. कोरोना आपत्ती लॉकडाऊन काळात पगार कपातीचे धोरण राबविण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

  राज्य शासनाने वर्ग १ व २ अधिकाऱ्यांचा दोन दिवसाचा तर वर्ग ३ आणि ४ कर्मचाऱ्यांचा एक दिवसाची पगार कपातीचे पञ जारी केले आहे. या पत्राचा संदर्भ देत सीईओ दिलीप स्वामी यांनी स्थानिक पातळीवर ऑक्सीजन बेड उपलब्देसाठी एक दिवसाचे पगार देण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सभ्रम आवस्था निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सीजन प्लाँट किंवा ऑक्सीजन बेडसाठी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगारीची आपेक्षा सीईओ यांनी व्यक्त केली आहे. यात जि.प.शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी संमती घेण्यात येणार आहे. सुमारे २ कोटी ७० लाखांपर्यंतचा निधी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय पगारीतून जमा होणार आहे.

  जि.प.कर्मचारी पतसंस्था आणि विविध कर्मचारी संघटने मार्फत यापुर्वीचं कोविड केअर सेंटर उभारणीला योगदान देण्यात आले आहेत.एक दिवसीय पगार कपाती निर्णय संदर्भात विविध कर्मचारी संघटनेची बैठक होणार असून बैठकीत पूढील दिशा ठरविण्यात येणार आहे.

  दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाकडून एक दिवसीय पगार देण्यासंदर्भातील पञ विभाग प्रमूखांना आदयप देण्यात आले नसल्याची माहीती समोर आली आहे.

  ऑक्सीजन बेडसाठी जि.प.प्रशासनाकडून एक दिवसीय वेतन देण्यासाठी कोणते ही पत्र आले नाही. पञ आल्यावर विविध कर्मचारी संघटनेशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल

  -विवेक लिंगराज, राज्य सरचिटणीस, जि.प. यूनियन

  “गेल्या दोन महीन्या पासून पगारी झाल्या नाहीत . पहील्यांदा पगारी करा मग बघू पगार दयायचं का नाही. सीएम फंडात एकदिवसीय पगार जमा करणार आहोत..”
  -गिरीष जाधव ,अध्यक्ष ,बहूजन मागासवर्गी जि.प.कर्म.संघटना

  “सीईओंच्या आवाहनानुसार एक दिवसाचा पगार आम्ही ऑक्सीजन बेडसाठी देण्यास तयार आहोत.”
  -राजेश देशपांडे, जिल्हाध्यक्ष, जि.प.कर्मचारी महासंघ