सोलापूरची कन्या‌ बनली गोंदियाची जिल्हाधिकारी

नयना गुंडे या मूळच्या सोलापूरच्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण गावचे सुपुत्र डॉ. अर्जुन गुंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. डॉ. अर्जुन गुंडे हे सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १९९२ साली नयना गुंडे यांनी प्रशासकीय सेवेत पदार्पण केले. त्यांनी यापूर्वी कुर्डुवाडी व सोलापूर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर नाशिक विभागात म्हाडाच्या मुख्याधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.

    सोलापूर : सोलापूरची कन्या असलेल्या नयना अर्जुन गुंडे यांनी मंगळवारी गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

    नयना गुंडे या मूळच्या सोलापूरच्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदगव्हाण गावचे सुपुत्र डॉ. अर्जुन गुंडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. डॉ. अर्जुन गुंडे हे सध्या सोलापूर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. १९९२ साली नयना गुंडे यांनी प्रशासकीय सेवेत पदार्पण केले. त्यांनी यापूर्वी कुर्डुवाडी व सोलापूर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर नाशिक विभागात म्हाडाच्या मुख्याधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. नाशिक विभागातच उपमहानिरीक्षक नोंदणी विभागाचे कामकाजही त्यांनी पाहिले. २०१४ साली त्यांचे आयएएस म्हणून प्रमोशन झाले. प्रमोशन झाल्यानंतर नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर पुणे परिवहन महामंडळात चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून, यशदा ट्रेनिंग प्रबोधनी येथे उपमहासंचालक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. प्रत्येक पदावर काम करीत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून त्यांनी काम केले. त्यांच्या चांगल्या कामाची पोचपावती देत शासनाने त्यांची गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीने सोलापूर जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.