crime scene

मित्र नगर शेळगी येथील सुनील नगरमध्ये मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली असून, संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    सोलापूर : मित्र नगर शेळगी येथील सुनील नगरमध्ये मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली असून, संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    अतुल याला दारूचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वी अतुल याने आई वंदना एकनाथ कोळेकरकडे पैशाची मागणी केली होती. आईने पैसे न दिल्याच्या रागातून अतुल याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

    आरोपीने आईच्या डोक्यात धारदार शस्त्राने हल्ला करून ठार केले. काही दिवसांपूर्वी आरोपी अतुल याने आई वंदनाकडे पैसे मागितले होते. ते तिने दिले नसल्याचा राग आरोपीच्या मनात होता. यातून त्याने खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

    जोडभावी पेठ पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. हत्येमागे आणखी काही अन्य कारणे आहेत का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.