बार्शीत लसीकरणासाठी विशेष मोहीम ; तब्बल बारा ठिकाणी फिरते लसीकरण केंद्र

उपळाई रोड, अलीपूर रोडवरील पवार हॉस्पिटल, नाळे प्लॉट येथील अंगणवाडी क्रमांक 7, आणि आडवा रस्ता येथील गणपती मंदिर या ठिकाणी रात्री नऊ वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे. तर दिवसा नगरपरिषद आवार, सोलापूर रस्त्यावरील शाळा क्रमांक 8, नागोबा मंदिर इत्यादी ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

    बार्शी : शासनाच्या मिशन कवच-कुंडल या योजनेअंतर्गत लसीकरणाच्या विशेष मोहिमेत बार्शी नगरपरिषद आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान मार्फत फिरते लसीकरण केंद्र सुरू केले आहे.शहरात तब्बल 12 ठिकाणी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे लसीकरण अभियान सुरू राहणार असल्याचे नोडल अधिकारी डॉ. सुधीर घोडके यांनी सांगितले.

    उपळाई रोड, अलीपूर रोडवरील पवार हॉस्पिटल, नाळे प्लॉट येथील अंगणवाडी क्रमांक 7, आणि आडवा रस्ता येथील गणपती मंदिर या ठिकाणी रात्री नऊ वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे. तर दिवसा नगरपरिषद आवार, सोलापूर रस्त्यावरील शाळा क्रमांक 8, नागोबा मंदिर इत्यादी ठिकाणी लसीकरण सुरू आहे.

    सध्या राज्यामध्ये तालुक्यात लसीकरणासाठी बार्शी शहर आणि तालुका अव्वल आहे. शहरातील 18 वर्ष पूर्ण असलेल्या सर्व नागरिकांसाठी लस उपलब्ध आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेऊन कोरोना पासून बचाव करावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवारी शहरात एकूण एक हजार जणांना कोविशील्ड लस देण्यात आली. तर मंगळवारी 12 ठिकाणी लसीकरण करण्यात आले. सध्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून शहरासाठी 6 हजार डोस उपलब्ध असल्याची माहिती डॉ. घोडके यांनी दिली.