लकी चौकातील आपटे ज्वेलर्स येथे चोरी करणाऱ्या चोरट्या महिला सीसीटीव्हीत कैद

कोरोनाच्या महामारी मध्ये लॉक डाऊन नंतर चोऱ्यांचे प्रमाण सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास यंत्रे गतीने फिरून आरोपीही पकडण्यात चांगले यश मिळत आहेत. परंतु त्यांच्या कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस कमी पडताना दिसून येत आहेत.

    सोलापूर : सोलापूर शहरातील लकी चौकात असलेल्या गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानातून ही चोरी सायंकाळी पाचच्या सुमारास झाली, चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे तीन महिला चोर व त्यांच्यासोबत एक लहान मुलगा दिसत आहे.

    शहरातील विजापूर रोडवरील राजस्व नगरातील प्रभावती ज्ञानोबा शिरगिरे या आपल्या पाटल्या बदलून घेण्यासाठी लकी चौकातील गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात गेल्या होत्या, पाटल्या त्यांनी बॅगेत ठेवल्या होत्या, दरम्यान त्या दुकानांमध्ये राखी पाहत असताना त्याच वेळेस त्यांच्या बॅगेतून या पाटल्या महिला चोरांनी चोरल्या. ही घटना सराफ दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेली आहे. पाटल्या चोरून महिला तिथून लगेच पसार झाल्या. घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा ची क्लिप पाहून चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

    कोरोनाच्या महामारी मध्ये लॉक डाऊन नंतर चोऱ्यांचे प्रमाण सोलापूर शहर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास यंत्रे गतीने फिरून आरोपीही पकडण्यात चांगले यश मिळत आहेत. परंतु त्यांच्या कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस कमी पडताना दिसून येत आहेत. आता हा नवीन सोने चोरीचा प्रकार फौजदार चावडी पोलिसां समोर आला असून पोलीस आरोपींना अटक करतील परंतु मुद्देमाल हस्तक होण्याची शासकता फिर्यादी कडून व्यक्त होत आहे. आमचे सोने आम्हाला लवकरात लवकर मिळावे अशी अपेक्षाही ज्ञानोबा शिरगिरे फिर्यादीने व्यक्त केली आहे.