गप्पा मारण्याच्या कारणावरून दगडाने मारहाण ; चौघांवर गुन्हा

बसवराज मल्लिनाथ करजगी (वय-२९,रा.भारतरत्न इंदिरा नगर,सोलापुर) यांच्या घराजवळ वरील सर्व आरोपी मिळून जोरजोरात गप्पा मारत उभे होते.त्यावेळी फिर्यादी बसवराज यांचे आई वडील यांनी जाऊन आरोपींना तुम्ही येते का थांबलात घरी जावा असे म्हणाले असता,आरोपींनी आम्ही लहानपणापासून येते थांबतो तुम्हाला काय करायचे आहे असे म्हणून फिर्यादीच्या आई-वडिलांसोबत हुज्जत घातली.

    सोलापूर : घरासमोर विनाकारण जोरजोरात गप्पा मारत असल्याच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.८ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भारतरत्न इंदिरा नगर सोलापूर येथे घडली.ऋषिकेश देडे,अनिकेश देडे,अक्षय बुर्ला, इम्रान इनामदार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी बसवराज मल्लिनाथ करजगी (वय-२९,रा.भारतरत्न इंदिरा नगर,सोलापुर) यांच्या घराजवळ वरील सर्व आरोपी मिळून जोरजोरात गप्पा मारत उभे होते.त्यावेळी फिर्यादी बसवराज यांचे आई वडील यांनी जाऊन आरोपींना तुम्ही येते का थांबलात घरी जावा असे म्हणाले असता,आरोपींनी आम्ही लहानपणापासून येते थांबतो तुम्हाला काय करायचे आहे असे म्हणून फिर्यादीच्या आई-वडिलांसोबत हुज्जत घातली.त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीचा भाव आरोपींना विचारपूस करत असताना आरोपी ऋषिकेश देडे याने फिर्यादीचा भाऊ सचिन याच्या डोक्यात बीयरची बाटली मारून दुखापत करून आरोपी अनिकेश देडे याने दगडाने मारहाण केली.त्यानंतर आरोपी अक्षय बुर्ला व इम्रान इनामदार यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी फिर्यादी बसवराज व त्यांचा भाऊ आई-वडील यांना मारहाण करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे,या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे हे करीत आहेत.